Riteish Deshmukh and Genelia Sakal
मनोरंजन

Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या 'वेड' या चित्रपटाची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा बहुचर्चित 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आठवड्याभरात वेड या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या नवीन वर्षात एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत चाहते नवीन वर्षात नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा कॉमेडी ड्रामा फिल्म 'सर्कस' आणि अभिनेता रितेश देशमुखचा मराठी चित्रपट 'वेड' हे गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झाले असून, बॉक्स ऑफिसवर स्थिर व्यवसाय करत आहेत.

यासोबतच 'अवतार द वे ऑफ वॉटर' आणि 'दृश्यम 2' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. पण, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा बहुचर्चित 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आठवड्याभरात वेड या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.65 कोटी, सहाव्या दिवशी 2.55 कोटी, तसेच सातव्या दिवशी देखील 2.45 कोटींची कमाई केली आहे. वेड या सिनेमाने 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला आहे. ट्रेड रीपोर्ट आणि एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘वेड’ या चित्रपटाने 9 व्या दिवशी तब्बल 5 कोटीचा गल्ला केला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची ही सर्वात मोठी कमाई आहे.

'वेड' या सिनेमात रितेश-जिनिलियासह अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच वेडया सिनेमामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

जिनिलिया देशमुखने 'वेड' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. वेड या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रितेश-जिनिलिया हे लव्हली कपल देखील वेड सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. तसेच वेड या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.

हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, सुपरस्टार रणवीर सिंगचा 'सर्कस' आणि अजय देवगणचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'दृश्यम 2' सध्या बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहेत. एकीकडे रिलीजच्या पहिल्या तीन दिवसात अयशस्वी ठरलेल्या 'सर्कस'च्या 14व्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलत असताना, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या सिनेमाने गुरुवारी 45 लाखांची कमाई केली आहे. . त्यामुळे सर्कसचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 36.82 कोटींवर गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT