Ritesh Genelia Bollywood celebrity Viral Video son esakal
मनोरंजन

Ritesh Genelia Viral Video : 'मुलांवर चांगले संस्कार आहेत!' रियान-राहिलचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला

मराठी - हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध कपल म्हणून रितेश-जेनेलियाच्या नावाची नेहमीच चर्चा असते. त्यांच्या वेड चित्रपटानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

सकाळ डिजिटल टीम

Ritesh Genelia Viral Video : मराठी - हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध कपल म्हणून रितेश - जेनेलियाच्या नावाची नेहमीच चर्चा असते. त्यांच्या वेड चित्रपटानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या दोन्ही सेलिब्रेटींची मुलं रियान आणि राहिलचीही चर्चा होत असते. आता एका व्हिडिओमुळे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

रितेश-जेनेलियाच्या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यांच्या व्हिडिओला मिळणारे लाईक्स आणि कमेंटसही चर्चेत असतात. गेल्या वर्षी या दोन्ही सेलिब्रेटींचा वेड नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून वेड चित्रपटाचे नाव घेतले गेले.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, रितेश जेनेलियाची दोन्ही मुलं फोटोग्राफर्सला पाहिल्यावर हात जोडतात. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रितेश-जेनेलियाचे कौतूक केले आहे. तुम्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्यांना चांगली शिकवण दिली आहे. अशा शब्दांत त्यांचे कौतूक केले आहे. यापूर्वी देखील रितेश-जेनेलियाच्या रियान आणि राहिलवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता.

एका नेटकऱ्यानं त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, रितेश-जेनेलिया हे बॉलीवूडचं लोकप्रिय तितकचं क्युट कपल आहे. त्यांचे व्हिडिओ मनोरंजन आणि खूप काही शिकवून जाणारे असतात. ते चांगले कलाकाराबरोबरच आदर्श पालकही आहेत. असे म्हटले आहे. मुंबईतल्या एअरपोर्टवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवरील प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT