riva arora, riva arora new car, riva arora news, uri SAKAL
मनोरंजन

Riva Arora: गाडी घेतलीस पण लायसन्स? उरी फेम १३ वर्षांच्या अभिनेत्रीने तब्बल ४४ लाखांची गाडी घेतली आणि...

रिवा अरोराला भेट दिलेल्या कारची किंमत सुमारे 44 लाख रुपये आहे

Devendra Jadhav

Riva Arora News: अभिनेत्री रिवा अरोरा ही एक चर्चेत असणारी बालकलाकार आहे. फार कमी वयात रिवाने अभिनय क्षेत्रात मोठी मजल मारली आहे.

2019 मधील 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' (Uri The Surgical Strike) सिनेमात रिवाने गुंजनची भूमिका साकारली होती. याशिवाय २०२० मध्ये आलेल्या 'गुंजन सक्सेना' सिनेमात रिवाने अभिनय केलाय. आता रिवा एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल झालीय.

(riva arora get troll after she buy new expensive car )

जेव्हा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री गाडी घेतात तेव्हा त्यांचे फॅन्स त्यांचं कौतुक करत असतात. पण रिवा मात्र ट्रोल झालीय.

अलीकडेच रिवा अरोराने इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स झाल्याचा आनंद साजरा केला. याशिवाय रिवाच्या आईने तिला एक ऑडी Q3 कार भेट दिली, ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील.

रिवा अरोराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोत रिवाच्या बाजूला १० मिलियनचा आकडाही दिसतोय.

रिवा अरोराला भेट दिलेल्या कारची किंमत सुमारे 44 लाख रुपये आहे. पण रिवाच्या कमेंट सेक्शनमध्ये ट्रोलर्सने तिला ट्रोल केलंय.

13 वर्षांची असल्याने तिच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? त्यामुळे ती गाडी चालवू शकते का? असा सवाल नेटकऱ्यांनी तिला विचारलाय. पण तरीही कमी वयात एवढी मोठी मजल मारल्याने रिवाला तिच्या फॅन्सने शुभेच्छा दिल्यात.

मागील काही दिवसांपासून रिवा चर्चेत आली ती तिच्या वयाने मोठया असणाऱ्या अभिनेत्यासोबत रोमांस करतांनाच्या एका सीनमुळे. त्यानंतर तिच्या वयाबद्दल बोललं गेलं. इतक्या कमी वयात ती इतकी ग्लॅमरस कशी काय झाली आहे.

या प्रश्नावर आता रिवाने मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी रिवा अरोरा मिका सिंगसोबतच्या डान्स व्हिडिओमध्ये दिसली होती, जे लोकांच्या पसंतीस उतरले नाही. रिवाने तो व्हिडिओ शूट केला तेव्हा ती फक्त 12 वर्षांची होती असं म्हणतं तिच्यावर टिका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT