Roadies 19: Esakal
मनोरंजन

Roadies 19: रोडीज 19 मध्ये स्पर्धक नाही तर जजच भिडले! चालू शोमध्ये केली हाणीमारी..

Vaishali Patil

Roadies 19: गेल्या काही दिवासांपासुन रोडीज शो चर्चेत आहे. हा शो खुपच वादग्रस्त मात्र तितकाच लोकप्रियदेखील आहे. आता या शोचा 19 व्या सिझनचा प्रीमियर होणार आहे. सध्या शोमध्ये ऑडिशन सुरु होते. जे आता पुर्ण झाले आहेत.

योवेळी शोमध्ये नवा पाहुणा म्हणुन अशनीर ग्रोव्हर ही नव्या भागात दिसला. प्रत्येक गँगच्या लिडरने आपआपल्या दहा स्पर्धकांची निवडही केली आहे.

हा शो असा आहे की जिथे टाक्सही खेळले जातात. या शोमध्ये खुप वाद विवाद आणि राडे होत असतात. हा शो तरुण पिढीत जास्त लोकप्रिय आहे. त्यातच आता शोमध्ये स्पर्धक नाही तर शोचे लिडर आपआपसात भांडतांना दिसले. ते भांडलेच नाही तर भांडण हे हाणामारीपर्यंत गेले.

शोच्या निर्मात्यांनी आगामी भागाचा प्रोमो बाहेर शेयर केला आहे. ज्यामध्ये दोन गँगच्या लिडरमध्ये भयानक लढत झालेली दिसत आहे. हे दोन्ही गँग लीडर शोमध्ये सर्वांचे लाडके आहेत, परंतु एका टास्क दरम्यान ते एकमेकांसोबत चांगलेच भिडले.

Roadies 19:

'रोडीज 19' चा नवीनतम प्रोमो सध्य सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गँगचा नेता प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यात जोरदार वाद झाला आहे. भांडत असतांना त्यांनी मारामारीही केली. हे पाहून शोचे बाकीचे सदस्यही हैराण खुपच हैराण झाले होते.

सुरुवातीला गौतमला खुप राग आला आणि त्याने प्रिन्सला धक्का दिला. यानंतर प्रिन्स आणि गौतममध्ये बाचाबाची झाली. दोघेही समोरासमोर भिडतात आणि एकमेकांची मान पकडतात. दोघांमध्ये भांडण सुरू होईल असे दिसते. वाद वाढतो तेव्हा सोनु सूद त्यांना सोडवण्याचा पयत्न करतो मात्र ते काही शांत बसत नाहीत.

गौतम म्हणाला, "हिंमत असेल तर मला हात लावं मग पहा मी कोण आहे ते दाखवतोच.." प्रिन्सही मागे हटत नाही आणि म्हणतो, "मी इथं तुमचा बॉस आहे आणि गेममध्ये ओजी आहे.. माझ्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला दिसेल." मात्र थोड्यावेळानंतर सोनुसूद दोघांना शांत करतो. याआधीही शोमध्ये प्रिन्स आणि रिया चक्रवर्ती यांच्यातही बरेच वाद झाले आहेत. प्रिन्सने तर शो सोडण्याचीही धमकी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT