Roadies Season 19 Winner Esakal
मनोरंजन

Roadies Season 19 Winner: वाशु जैन ठरला रोडीज 19 विजेता तर शिवेत तोमर उपविजेता...

Vaishali Patil

Roadies Karm Ya Kand: 'रोडीज: कर्म या कांड' चा 19वा सिझन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. या सिझनमध्ये अनेक नवनव्या गोष्टी पहायला मिळाल्या. यावेळी प्रिन्स नरुला सोबत, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे दोन गँग लीडर दिसले.

या सिझनमध्ये स्पर्धकांपेक्षा जास्त वाद टिम लीडरमध्ये पहायला मिळाले. रविवारी, 15 ऑक्टोबरला या शोच्या फिनालेमध्ये 19 व्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. अंतिम फेरीत टॉप 5 स्पर्धक बाकी होते त्यानंतर टॉप 3 स्पर्धकांपैकी एक विजेता ठरला.

'एमटीव्ही रोडीज - कर्म या कांड' च्या 19 व्या सीझनचा विजेता ठरला वाशू जैन. वाशू जैन हा रिया चक्रवर्तीच्या गँगमध्ये होता. यासोबत प्रिन्स नरुलाच्या गँगचा सिवेत तोमरने उपविजेता ठरला.

बिलासपूरचा रहिवासी असलेल्या वाशू जैनने सिझनच्या ट्रॉफीसह 5 लाखांचे बक्षीसही मिळवले आहे. एमटीव्ही रोडीज - 'कर्म या कांड' या रिअॅलिटी शोच्या 19 व्या सीझनमध्ये त्याने त्याच्या प्रचंड ताकदीने आणि लवचिकतेने सर्वांना धक्क केलं आणि या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

सोनू सूदने होस्ट केलेला, शो 30 स्पर्धकांसह सुरू झाला आणि प्रथमच गँग लीडर म्हणून रिया आणि गौतम गुलाटी यांच्यासह प्रिन्स नरुलाने आपल्या गँगमधील स्पर्धाकांना उत्तम साथ देत हा सिझन यशस्वी केला.

शो जिंकल्यावर वाशूने सर्वांचे आभार मानले आणि त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. तो म्हणाला, "रोडीज - कर्म या कांड हा शो जिंकणे हा घामाचा, अश्रूंचा आणि अतूट बंधांचा प्रवास होता. हा सर्वोत्तम भावनांपैकी एक होता.

माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात रोडीज - कर्म या कांड चा मोलाचा वाटा होता. गँग लीडर रिया मॅडम आणि सोनू सरांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तसेच, माझ्यावर पहिल्यापासून विश्वास ठेवल्याबद्दल प्रिन्स सरांचे आभार."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT