Rocky Aur Rani Ki Prem Kahani teaser out now starring ranveer singh alia bhatt dharmendra jaya bachchan  SAKAL
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser: मस्तीखोर रणवीर, प्रेमळ आलिया.. सिनेमाचा टिझर एकदा बघाच

भव्यदिव्य कौटुंबिक मनोरंजन सिनेमा म्हणून रॉकी और राणी कि प्रेम कहाणी सिनेमा असणार यात शंका नाही

Devendra Jadhav

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser: रॉकी और रानी कि प्रेम कहानी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अनेक दिवसांपासून सिनेमाचा टिझर आणि ट्रेलर कधी रिलीज होणार याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर रॉकी और राणी कि प्रेम कहाणी सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या वर्षातला भव्यदिव्य कौटुंबिक मनोरंजन सिनेमा म्हणून रॉकी और राणी कि प्रेम कहाणी सिनेमा असणार यात शंका नाही

सिनेमाच्या टीझरमध्ये काय?

या चित्रपटाच्या काही सेकंदांच्या टीझरमध्ये रॉकी आणि राणीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ही लव्हस्टोरी या दोघांना कुठून नेणार, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल, त्यासाठी तुम्हाला २८ जुलैची वाट पाहावी लागणार आहे. टीझरमध्ये रणवीर आणि आलियाचा रोमान्स रंगला होता. याशिवाय आलियाही वधूच्या जोडीत दिसली होती. तर दुसरीकडे चित्रपटाचा आलिशान सेट आणि उत्कृष्ट आउटफिट्स आणि टीझर पाहता चित्रपटाची कथा एकदम एंटरटेनमेंट करणारी असेल यात शंका नाही. शाहरुख खानने रॉकी और रानी कि प्रेम कहानी चा टिझर शेअर केलाय.

करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या वर्षी २८ एप्रिलला रिलीज होणार होता. पण या सिनेमाची पहिली झलक आज भेटीला आली असुन रणवीर - आलियाचा रॉकींग अंदाज पहायला मिळतोय.

सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली असुन 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT