Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office day 7 collection Esakal
मनोरंजन

RARKPK Box Office Collection Day 7: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सुसाट! सात दिवसात कमावले इतके कोटी..

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.

Vaishali Patil

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani box office day 7 collection: बॉलिवूडची सुपरजोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झालेला दिसत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टिमनं सक्सेस पार्टी देखील आयोजित केली होती. ज्यात या चित्रपटाला मिळणार यश साजरा करण्यात आला.

आलिया आणि रणवीरची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खुप आवडत आहे. यासोबतच 'रॉकी और राणी की प्रेमकहानी'ला आता रिलिज होऊन सात दिवस झाले आहेत. सातव्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सूक होते. तर आता चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलीजच्‍या 7व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर बुधवारी चित्रपटाची कमाई 6.9 कोटी रुपये होती. आता या चित्रपटाची 73.62 कोटींवर गेली आहे.

आता करण जोहरचा 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' चित्रपटाने 7 दिवसांत 70 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या विकेंडला देखील या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी कोणताही बिग बजेट सिनेमा नसल्याने हा चित्रपट या विकेंडला देखील चांगली कमाई करत १०० कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाची स्टोरी दोन वेगळ्या विचारांचे लोक आणि दोन वेगळ्या कुटुंबाभोवती फिरते. यात रॉकी पंजाबी तर आलिया बंगाली परिवारातील आहे. जे लग्न करण्यासाठी आपले कुटूंब आपआपसात बदलतात. या चित्रपटात आलिया आणि रणवीरच्या प्रेमकहानीपेक्षा जास्त तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लव्हस्टोरीची जास्त चर्चा रंगली आहे.

एक रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. रणवीर-आलियाशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील चित्रपटात आहेत. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT