Rocky Aur Rani Ki Prem Kahaani, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani poster launch, Rocky Aur Rani Ki Prem Kahaani first look, karan johar, ranveer singh ,Rocky Aur Rani Ki Prem Kahani Movie Twitter Review  Esakal
मनोरंजन

Rocky Aur Rani Kii Prem Kahani: रॉकी अन् राणीची कहाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार की आपटणार! काय म्हणते पब्लिक

'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर या चित्रपटाचे अनेक रिव्ह्यू चाहते ट्विट करत आहेत.

Vaishali Patil

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Movie Twitter Review: बॉलिवूड मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाची खुप चर्चा होती. हा चित्रपट म्हणजे करण जोहरचा मोस्ट अवेटेड 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

या चित्रपटात सुपरहिट जोडी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. गली बॉयनंतर प्रेक्षकांना ही जोडी या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. जवळपास सात वर्षांनंतर करण जोहरने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आता रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहून आल्यानंतर लगेचच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे रिव्ह्यू शेयर करायला सुरुवात केली आहे.

चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर या चित्रपटाचे अनेक रिव्ह्यू ट्विट व्हायरल होत आहेत. 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या संस्कृतीच्या कुटूंबाच्या लोकांभोवती फिरतो. आलिया अन् रणवीर म्हणजेच रॉकी आणि रानी जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने आपलं कुटुंब आपापसात बदलतात.

आलिया भट्टने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच या चित्रपटात काम केले आहे. तिला पाहिल्यानंतर चाहते तिचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खुपच आवडत आहे. काहींनी लिहिलयं खुप दिवसांनंतर बॉलिवूडला हे काम जमलं आहे. काहींना हा चित्रपट खुपच मनोरंजन करणारा आणि तितकाच मनावर परिणाम करणारा वाटला आहे.

एकानं लिहिलयं, 'जूना बॉलिवूडचा काळ परत आला आहे. सर्व भावनांचा अप्रतिम अनुभव #RockyAurRaniKiiPremKahaani स्क्रीनवरून तुम्ही नजर हटवू शकणार नाही.'

तर एकानं करण जोहरचं कौतुक करत लिहिलयं, '#RockyAurRaniKiiPremKahaani मध्ये करणच्या चित्रपटात तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी दिसतील. हाय एनर्जी, ओव्हर-द-टॉप जोक, कधीकधी खूप मजा, खुप सारा मेलोड्रामा. पण हा सर्वात विध्वंसक चित्रपटही आहे. दुर्गापूजेच्या शेवटच्या क्षणी त्या एका क्षणाने मला थक्क केलं. धन्यवाद करण!

'#RockyAurRaniKiiPremKahaani हा करण जोहरचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.... करण जोहरचे अभिनंदन... तुमने आग लगा दिया भाई….. गर्दा उडा दिया.. आलिया तू आमच्या भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेला हिरा आहेस .. किती उत्कृष्ट कामगिरी आहे.' असं एकाचं म्हणणं आहे.

या ट्विटवरुन तर असाच अंदाज बांधला जाऊ शकतो की प्रेक्षकांना रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट तुफान आवडलेला दिसत आहे.

रणवीर सिंगसोबत बॉलिवूड स्टार्स वरूण धवन, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांचा कॅमिओ आणि धर्मेंद्र आणि जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्याही महत्वाच्या भुमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT