Hansal Mehta Tweet News Hansal Mehta Tweet News
मनोरंजन

Hansal Mehta : निवृत्त कोण झालयं? फेडरर की अरबाज? हंसल मेहतांच्या ट्विटने गोंधळ

रॉजर फेडरर आणि अरबाज खानचा लूक अगदी सारखाच आहे

सकाळ डिजिटल टीम

Hansal Mehta Tweet News टेनिस स्टार रॉजर फेडररच्या (Roger Federer) निवृत्तीवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर मेसेज पोस्ट केले आहेत. दरम्यान, चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या ट्विटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने रॉजर फेडररच्या जागी अरबाज खानचा (Arbaaz Khan) फोटो लावला आहे. त्याच्या पोस्टवर लोक कमेंट करीत आहेत. त्याने हॅशटॅगमध्ये रॉजर फेडररचे नाव घेतले आहे. फोटो मात्र अरबाज खानचा लावला आहे. यामुळे अरबाजला काय झाले असे युजर्स विचारत आहेत.

टेनिस स्टार रॉजर फेडररने (Roger Federer) गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. तेव्हापासून त्याचे चाहते भावुक झाले आहेत. जगभरातील लोक त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अनुष्का शर्मा, लारा दत्ता यांच्यासह अनेकांनी रॉजरसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

दरम्यान, हंसल मेहता यांच्या ट्विटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी लिहिले आहे, आय विल यू मिस चॅम्पियन. #रॉजर फेडरर. गंमत म्हणजे हंसल मेहताने ट्विटमध्ये रॉजर फेडररऐवजी अरबाज खानचा (Arbaaz Khan) फोटो टाकला आहे.

रॉजर फेडरर, अरबाज खानचा लूक सारखा

रॉजर फेडरर आणि अरबाज खानचा लूक अगदी सारखाच आहे. त्यांच्या जुळणाऱ्या चेहऱ्यावर यापूर्वीही अनेक मिम्स बनवले गेले आहेत. हंसल मेहताच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स येत आहेत. ज्यामुळे गोंधळ होत आहे. अनेक जण हंसलच्या जोकचा आनंद घेत आहेत, तर काही लोकांनी याला वाईट विनोदही म्हटले आहे.

अरबाज हा रॉजर फेडररचा चाहता

अरबाज खानला माहीत आहे की त्याची तुलना रॉजर फेडररशी केली जाते. एका मुलाखतीदरम्यान अरबाजने सांगितले होते की त्याला माहीत आहे की त्याचे लूक रॉजर फेडररसारखे आहे. त्याने असेही सांगितले की तो रॉजर फेडररचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला भेटू इच्छितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT