Rohini Hattangadi compared Ranbir & Ranveer Esakal
मनोरंजन

Rohini Hattangadi: 'मला रणवीरपेक्षा रणबीर जरा जास्त आवडतो..', कारण सांगत रोहिणी हट्टंगडी जरा स्पष्टच बोलल्या

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी रणवीरच्या खटकणाऱ्या आणि रणबीरच्या आवडणाऱ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Rohini Hattangadi: ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये मोठी तुलना केली आहे. इतकंच नाही तर ती तुलना करताना रणवीर सिंगचं सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये वागणं मला योग्य वाटत नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी हट्ट्ंगडी म्हणाल्या,''रणवीर सिंग चांगलाच आहे पण मला रणबीर कपूर थोडा जास्त आवडतो. यासंदर्भात पुढे बोलताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या,''रणवीर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये असताना वागतो ते आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं योग्य असेलही पण आमच्या जनरेशनसाठी नाही. रोहिणी यांच्या मते तुम्ही पब्लिक फिगर असाल तर तुम्ही लोकांमध्ये वागताना खूप विचारपूर्वक वागायला हवं,जे रणवीर वागत नाही'.

त्याच मुलाखतीत रोहिणी हट्टंगडी यांना आठवला आपल्या कारकिर्दीतला तो काळ जेव्हा त्यांना फक्त आईच्या भूमिका ऑफर व्हायच्या. 'अग्निपथ' सिनेमा करण्याआधी रोहिणी हट्टंगडी यांनी ठरवून टाकलं होतं की त्या आईच्या भूमिका कधीच करणार नाहीत. त्यांनी जवळपास तीन ते चार सिनेमांना त्यामुळे नकार दिला होता. त्यांच्या सेक्रेटरीनं शेवटी त्यांना असा नकार देण्यापासून थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण अभिनेत्रीनं मनाशी पक्क ठरवलं होतं मी खलनायिका साकारेन पण आईच्या भूमिका करणार नाही.

हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या,''जेव्हा मला 'अग्निपथ' ऑफर झाला तेव्हा मी आधीच ठरवलं होतं की मी आधी सिनेमाची स्क्रीप्ट ऐकणार आणि मग ठरवणार सिनेमा करायचा की नाही. 'अग्निपथ'मध्ये आईची भूमिका करण्यास रोहिणी हट्टंगडी का तयार झाल्या याविषयी सांगताना म्हणाल्या,''स्टोरी नरेशन सुरु असताना जवळपास अर्धी स्टोरी ऐकल्यावर मी 'अग्निपथ'मध्ये आईची भूमिका करण्यास होकार दिला. अमिताभच्या सिनेमात नेहमी हिरोईन,व्हिलन,हिरो म्हत्त्वाचे असायचे पण 'अग्निपथ'मध्ये छोट्यातलं छोटं कॅरेक्टर तितक्याच ताकदीनं दाखवलं जाणार होतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT