मनोरंजन

Ind Vs Nz semi final 23 : '#वडापाव' ही काय भानगड आहे? सोशल मीडियावर का होतोय ट्रेंड?

वर्ल्ड कप २३ मध्ये आज भारत विरुद्ध न्युझीलंड असा सेमी फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

युगंधर ताजणे

Rohit Sharma Ind Vs Nz semi final 23 world Cup social media : वर्ल्ड कप २३ मध्ये आज भारत विरुद्ध न्युझीलंड असा सेमी फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सलामीच्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी न्युझीलंडच्या वेगवान गोलंदाजीवर हल्लाबोल केला आहे.

या सगळ्यात सोशल मीडियावर इंडिया आणि न्युझीलंडच्या सामन्याचे वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यात हॅशटॅग वडापावनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक्सवर आलेल्या त्या मीम्समधून वडापाव आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अन् स्फोटक फलंदाज रोहित शर्मा याला उद्देशून वडापाव हा शब्द वापरला जात आहे.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

सोशल मीडियावर तर गेल्या काही दिवसांत भारताना वर्ल्ड कप जिंकला तर वडापाव ला नॅशनल फूडचा दर्जा दिला जावा अशी मागणी असंख्य नेटकऱ्यांनी केली होती. त्यानंतर आता भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सामन्यात एक्सवर वडापावच्या नावानं शेकडो पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. कित्येकांनी वडापाव हा शब्द रोहितला उद्देशून असल्याचे म्हटले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार रोहितनं आजच्या सामन्यात न्युझीलंड विरुद्ध तडाखेबंद ४७ धावांची खेळी केली. अवघ्या २९ चेंडुमध्ये त्यानं ही धावसंख्या केली. रोहित जेव्हा फलंदाजीला आला तेव्हापासून हॅशटॅग वडापाव ट्रेंडिंगवर असल्याचे दिसून आले. त्यात नेटकऱ्यांनी आपल्या आवडत्या फलंदाजाला शुभेच्छा दिल्या.

याशिवाय एक्सवर विराट कोहली, गिल यांच्या नावाचे हॅशटॅग वेगानं ट्रेंड करु लागले आहेत. गिलनं देखील त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली असून त्याला स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. भारत विरुद्ध न्युझीलंडच्या आजच्या सामन्याला बॉलीवूड, टॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

सुपरस्टार रजनीकांत, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर हे सेलिब्रेटी सामन्याचा आनंद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT