Rohit Shetty visiting Mauritius PM pravind jugnauth for shooting singham again ajay devgan SAKAL
मनोरंजन

Rohit Shetty: रोहीत शेट्टी मॉरीशस पंतप्रधानांच्या भेटीला, कारण ऐकुन फॅन्स खुश होतील

रोहीत शेट्टी आणि मॉरीशसच्या पंतप्रधानांची भेट चर्चेत

Devendra Jadhav

Rohit Shetty Meet Mauritius PM: बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक अॅक्शन सिनेमे देणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे रोहीत शेट्टी. रोहीत शेट्टीचा २०२२ च्या अखेरीस रिलीज झालेला सर्कस सिनेमा बॉक्स ऑफीसवर दणकुन आपटला.

आता रोहीत शेट्टी आगामी कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच रोहीत शेट्टीने मॉरीशसच्या पंतप्रधानांची भेट घेतलीय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. रोहीतने मॉरीशसच्या पंतप्रधानांची भेट का घेतली? हे कारण जाणुन घेतलंत, तर तुम्ही नक्की खुश व्हाल.

(Rohit Shetty visiting Mauritius PM pravind jugnauth)

का घेतली रोहीतने मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट?

डॅशिंग निर्माता-दिग्दर्शक नुकताच मॉरिशसमध्ये दिसला. रोहीतने मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांची भेट घेतली. रोहित शेट्टीने प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत त्याच्या आगामी चित्रपटासंदर्भात खास भेट घेतली होती.

खुद्द प्रविंद यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहीतने आगामी सिंघम अगेन सिनेमाच्या शुटींगनिमित्ताने मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट घेतली. त्यामुळे रोहीत लवकरच मॉरीशसमध्ये सिंघम अगेन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करेल.

कधी होणार सिंघम अगेनच्या शुटींगला सुरुवात?

रोहित ऑक्टोबरपासून मॉरिशसमध्ये त्याच्या सिंघम अगेन चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत रोहीतने याआधीही भेट घेतली होती.

2015 मध्ये, जेव्हा रोहीतने त्याच्या दिलवाले चित्रपटाच्या शुटींगनिमित्ताने मॉरिशसचे तत्कालीन पंतप्रधान अनिरुद्ध जुगनाथ यांची भेट घेतली होती.

सध्याचा मॉरीशसचा पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हा अनिरुद्ध यांचा मुलगा आहे. एकुणच सिंंघन अगेन शुटींगनिमित्ताने रोहीतचे मॉरीशस सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध दिसत आहेत.

सिंघन अगेन सिनेमाबद्दल..

रोहीत शेट्टीच्या आगामी सिंघन अगेन चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर सारखी उत्तम स्टारकास्ट आहे.

सध्या, रोहित शेट्टी खतरों के खिलाडीचा 13वा सीझन होस्ट करत आहे. आता सिंघम अगेन निमित्ताने रोहीत शेट्टी सर्कसचा फ्लॉप शिक्का पुसणार का, हे आगामी काळात कळुन येईलच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Army Attack : बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; सलग दुसऱ्या दिवशी पाच सैनिक ठार

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेध

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजन दिवशी चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर माता लक्ष्मी अन् कुबेर देव दोघेही होतील नाराज

SCROLL FOR NEXT