ronaldo ignore salman khan viral video in dubai riyadh know the truth here  SAKAL
मनोरंजन

Salman Khan - Ronaldo: भाईजान बाजुला उभा पण रोनाल्डोने केलं साफ दुर्लक्ष? व्हायरल व्हिडीओमागचं नेमकं सत्य बघा

सलमान खान - रोनाल्डोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, नेमकं खरंच असं घडलं का?

Devendra Jadhav

Salman Khan - Ronaldo Viral Video News: सलमान खान आणि रोनाल्डो हे दोघेही सध्या चांगलेच चर्चेत आहेत. एक बॉलिवुडचा सुपरस्टार तर दुसरा फुटबॉल जगतातला दिग्गज खेळाडू.

दोघेही सौदी अरेबिया येथे एकत्र आले होते. सलमान आणि रोनाल्डो यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात रोनाल्डोने सलमान खानकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय. पण खरंच असं घडलंय का? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(ronaldo ignore salman khan viral video in dubai riyadh know the truth here)

सलमान खान आणि रोनाल्डो यांचा व्हायरल व्हिडीओ

सलमान खान आणि रोनाल्डो यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात असं दिसतंय की बॉक्सिंग सामना संपल्यावर सलमान खान आणि रोनाल्डो उभे होते. तेव्हा रोनाल्डो सगळ्यांशी हात मिळवत होता.

सलमान खान रोनाल्डोच्या बाजुलाच उभा होता. पण रोनाल्डो सगळ्यांशी हात मिळवता मिळवता थेट पुढे निघुन जातो. तो सलमानकडे साफ दुर्लक्ष करतो. पण असं खरंच झालंय का?

सलमान - रोनाल्डोचा नवीन फोटो व्हायरल

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना रोनाल्डोने सलमानकडे दुर्लक्ष केलं असं वाटलं. पण प्रत्यक्षात तसं नाहीय. व्हायरल झालेल्या व्हिडीओत रोनाल्डो घाईत होता असं दिसतंय. त्यामुळे त्याचं अनावधानाने सलमान खानकडे दुर्लक्ष झालं होतं.

पण सलमानच्या फॅन्सनी एक फोटो व्हायरल केलाय. यात सलमान आणि रोनाल्डो एकमेकांशी मस्त गप्पा मारताना दिसत आहेत. रोनाल्डोची गर्लफ्रेंड सुद्धा त्यांच्यासोबत दिसतेय.

म्हणुन रोनाल्डो आणि सलमान खान आले होते एकत्र

रोनाल्डो आणि बॉलीवूड स्टार सलमान खान रियाधमध्ये एमएमए सामन्यादरम्यान एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. या दोघांना एकत्र पाहताच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला.

रोनाल्डो त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत होता, तर सलमान त्यांच्या शेजारी एकटाच बसला होता. रोनाल्डो आणि सलमानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल व्हायरल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT