RRR a gay film? Western audience finds it 'queer', Ram Gopal Varma reacts! Google
मनोरंजन

'RRR 'गे' सिनेमा?'; परदेशात रंगली चर्चा, राम गोपाल वर्मानं आगीत ओतलं तेल

RRR सिनेमानं बॉक्सऑफिसवर करोडोची कमाई केली आहे. सिनेमातील रामचरण,ज्युनिअर एनटीआर यांच्या भूमिकांना देखील डोक्यावर उचलून धरलं होतं.

प्रणाली मोरे

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) यांचा सुपरहिट RRR सिनेमा यावर्षीचा मास्टरपीस ठरला यात दुमत नाही. २५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमात राम चरण(Ramcharan) आणि ज्युनिअर एनटीआर(Jr.NTR) नं मुख्य भूमिका केल्या आहेत. तसंच,अजय देवगण,आलिया भट्टने देखील महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात साकारल्या आहेत. सिनेमानं बॉक्सऑफिसवर देखील धमाल केली होती. (RRR a gay film? Western audience finds it 'queer')

लोकांनी या सिनेमाच्या कथेची,गाण्यांची,यातील व्हिज्युअल इफेक्टची खूप प्रशंसा केली. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर ची मैत्री देखील सर्वांना आवडली. पण परदेशात मात्र त्यांच्या सिनेमातील या मैत्रीला पाहून वेगळाच सूर निघत आहे. तिथले लोक म्हणतायत, RRR 'गे' लोकांवर आधारित सिनेमा आहे. सिनेमातील कलाकारांच्या मैत्रीला तिथल्या लोकांनी रोमान्सचं नाव दिलं आहे. सोशल मीडियावर सध्या यावरनं जोरदार चर्चा रंगली आहे. चला,जाणून घेऊया पश्चिमेकडील देशांत लोक RRR विषयी नेमक्या काय उलट-सुलट चर्चा करीत आहेत. परदेशात RRR सिनेमातील रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मधील केमिस्ट्रीला पाहून लोक काय विचार करतायत हे सांगण्याआधी आम्ही आपल्याला प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा(Ram Gopal Verma) यांचे ट्वीट दाखवतो,ज्यामध्ये त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे,''मी बरोबर होतो. तो गे सिनेमा आहे - परदेशी प्रेक्षकांनी RRR ला गे लोकांवर आधारित सिनेमा समजलं आहे''.

आता चला पाहूया काही परदेशात राहणाऱ्या लोकांचे ट्वीट्स,जे म्हणत आहेत की RRR मध्ये 'गे' लोकांवर आधारित कहाणी दाखवली गेली आहे.

खरंतर या सिनेमाची कथा ही भीमा आणि सीताराम राजू या दोन मित्रांभोवती फिरते. जे खरंतर स्वातंत्र्यसेनानी असतात. राजामौलीनं आपल्या सिनेमात यांची मैत्री आणि इंग्रजांशी बदला घेण्याचं जबरदस्त कथानक दाखवलं होतं. सिनेमाविषयी बोलायचं झालं तर यात दमदार संवाद,गाणी आणि व्हिज्युअल इफेक्ट्स असे आहेत की आपण बघतच बसाल. अर्थात या जोरावरच तर सिनेमानं करोडोची कमाई केली आहे. या सिनेमानं साऊथ इंडस्ट्रीला आणखी वरचा दर्जा मात्र मिळवून दिला आहे हे विसरता कामा नये. अर्थात यामध्ये 'बाहुबली', 'पुष्पा','kGF' सिनेमांचा देखील वाटा आहेच.

सिनेमाच्या शूटिंग दरम्यान राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर खूप चांगले मित्र बनले. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना देखील दिसले. काही दिवसांपूर्वीच राम चरणने ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवशी त्याला आपला भाऊ,मित्र आणि सहकलाकार म्हटलं होतं. त्यानं पोस्ट करत लिहिलं होतं,''ज्युनिअर एनटीआर साठी माझ्या मनात काय भावना आहेत हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही''. पण आता त्यांच्या सिनेमाला परदेशातील लोक भलत्याच विषयाशी जोडत असल्यानं भारतीय चाहते मात्र नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT