RRR Movie Box Office Collection | RRR Movie News esakal
मनोरंजन

'काश्मीर फाइल्स'ला मागे टाकत RRR ची जगभरात 600 कोटींची कमाई

सकाळ डिजिटल टीम

येत्या आठवड्यातही चित्रपटाची अशीच कमाई सुरू राहील, असं ट्रेड तज्ज्ञांचं मत आहे.

RRR Movie : एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता, असं दिसतंय की राम चरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) या दोघांनीही त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातलीय. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. 'RRR' चं जगभरातील कलेक्शन पाहता हा चित्रपट 600 कोटींवर पोहोचलाय. (RRR Movie Box Office Collection)

येत्या आठवड्यातही चित्रपटाची अशीच कमाई सुरू राहील, असं ट्रेड तज्ज्ञांचं मत आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी अनेक भाषांमध्ये 250 कोटींचा व्यवसाय केला होता. एसएस राजामौली यांच्या चित्रपटानं फक्त हिंदी पट्ट्यात 74 कोटी 50 लाखांची कमाई केलीय. दरम्यान, पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई केल्यानंतर चित्रपटानं पाचव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. RRR या चित्रपटानं हिंदी पट्ट्यात एकूण 90.50 कोटी ते 92.50 कोटींचा गल्ला जमवलाय.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, या चित्रपटानं नवा विक्रम प्रस्थापित केलाय. हिंदी पट्ट्यातील टॉप 5 स्कोअरर चित्रपटांमध्ये RRR चित्रपटानं आपलं स्थान अव्वल स्थानावर ठेवलंय. तरण आदर्शनं ट्विट करून सांगितलं की, रणवीर सिंगचा चित्रपट '83' या यादीत 5 व्या स्थानावर आहे, ज्यानं 'सोमवार'मध्ये 7.29 लाख रुपयांची कमाई केलीय. चौथ्या क्रमांकावर गंगूबाई काठियावाडी आहे, ज्यानं 8 कोटी 19 लाख रुपये जमवले होते. सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 14 कोटी 51 लाखांची कमाई केलीय. तर, काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं 15.05 कोटी रुपयांची कमाई केलीय. मात्र, अव्वल स्थानावर असलेल्या RRR चित्रपटानं 17 कोटींची कमाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT