rrr direcor ss rajamouli jr ntr and ram charan desi look in oscars 2023 sakal
मनोरंजन

Oscars 2023: धोतर आणि कुडता! ऑस्करमध्ये दिसून आला राजामौलींचा साधेपणा.. चाहत्यांकडून होतंय कौतुक..

ऑस्करमध्ये चक्क धोतर कुडता नेसून आल्याने दिग्दर्शक राजामौली चर्चेत आले आहेत.

नीलेश अडसूळ

Oscars 2023 rajamouli: चित्रपट क्षेत्रातील जगभरात सर्वात मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडतो आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली.

अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा आहे. यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा असून भारतीयांसाठी तो प्रचंड महत्वाचा आहे. कारण भारताच्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला संगीत विभागातून नॉमिनेशन आहे.

पण पुरस्कार मिळण्याआधीच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आणि त्यांचं कारण ठरलेत दिग्दर्शक राजामौली..

rrr direcor ss rajamouli jr ntr and ram charan desi look in oscars 2023

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पण त्या आधीच आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली चर्चेत आले आहेत. कारण काही वेळा पूर्वीच त्यांनी ऑस्करच्या रेड कारपेटवर हजेरी लावली आणि सगळ्यांचे डोळे फिरले. जय दिमाखदार सोहळ्यात सगळे सुटबुट घालून येतात तिथे राजामौली चक्क धोतर, कुडता आणि मोजडी घालून आले आहेत.

त्यांचा हा लुक सध्या चर्चेचा विषय झाला असून, त्यांना वाटणारी परंपरेची ओढ, आस्था यातून दिसून येते असे चाहत्यांनी म्हंटले आहे.

एवढेच नाही तर अभिनेता ज्युनिअर एनटीआर व राम चरण देखील ऑस्कर सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेट. या सोहळ्यात त्यांनीही भारतीय पद्धतीचे कपडे परिधान केले आहेत. काळ्या रंगांचे इंडो वेस्टर्न प्रकरतले कपडे त्यांनी परिधान केले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती 'नाटू नाटू'ला ऑस्कर मिळण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

SCROLL FOR NEXT