RRR director SS Rajamouli to work again with Alia Bhatt?  Google
मनोरंजन

बाळाच्या जन्मानंतर आलियाची धमाकेदार एन्ट्री, राजामौलीं सोबत सिनेमाची रंगली चर्चा...

आलिया भट्ट साऊथचे सुपरस्टार दिग्दर्शक राजामौलींसोबत पुन्हा काम करतेय या बातमीची चर्चा ट्वीटरवर अधिक रंगलेली दिसून आली.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट थांबायचं काही नाव घेताना दिसत नाही. अर्थात हे साल अभिनेत्रीसाठी खूप चांगलं राहिलं आहे. सुरुवातीला 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचं मोठं यश तिच्या वाट्याला आलं. त्यानंतर रणबीर कपूरसोबत तिचं लग्न झालं. त्यानंतर लगेच तिनं प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली, आता सध्या ती 'ब्रह्मास्त्र'चं यश एन्जॉय करत आहे. आता बातमी आहे की आलिया भट्ट बाळाला जन्म दिल्यानंतर साऊथचे सुपरस्टार दिग्दर्शक राजामौली यांच्यासोबत सिनेमा करतेय. ट्विटरवर याविषयीच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या आहेत.(RRR director SS Rajamouli to work again with Alia Bhatt? )

एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे,ज्यामध्ये बोललं जात आहे की ही बातमी कन्फर्म आहे. आलिया भट्टने एस.एस.राजामौली यांच्यासोबत सिनेमा साइन केला आहे. या सिनेमात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट बाळाला जन्म दिल्यानंतर सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी महेश बाबू बॉलीवूडविषयीच्या त्याच्या एका वक्तव्यावरुनं भलताच चर्चेत आला होता. त्याचं म्हणणं होतं की, बॉलीवूडला त्याची फी परवडणार नाही,कारण तो खूप महागडा अभिनेता आहे. बोललं जात आहे की राजामौली यांचा हा सिनेमा मोठ्या बजेटचा आहे.

आलिया पुन्हा राजामौली यांच्यासोबत काम करणार हे कळल्यानंतर आलियाचे चाहते मात्र खूश आहेत. आलिया भट्ट बाळाला या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जन्म देईल अशी बातमीही कानावर पडत आहे. नीतू कपूर यांनी आलिया भट्टसाठी डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रमही ठेवला आहे. यामध्ये आलिया भट्टची आई सोनी राझदान देखील त्यांना सहकार्य करत आहे. दोघींनी मिळून आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी केली आहे. या डोहाळे जेवणात फक्त गर्ल्स गॅंग सामिल होणार असं बोललं जात आहे.

आलिया भट्टच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं काही महिन्यांपूर्वी 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलीवूड सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यांनतर ती 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसली. आलिया आपला प्रेग्नेंसीचा काळ खूप एन्जॉय करतेय हे तिच्या चेहऱ्यावरील ग्लो वरनं स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे बळी प्रवासी ठरले! मुंबई लोकलवरील अपघातात ३ जणांचा मृत्यू

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT