jr ntr birthday sakal
मनोरंजन

'ज्युनिअर एनटीआर'वर झाला होता बालविवाहाचा आरोप.. अल्पवयीन मुलीशी..

दाक्षिणात्य चित्रपटांसह अवघ्या भारतातील प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'ज्युनिअर एनटीआर'चं लग्न भलतंच गाजलं होतं..

नीलेश अडसूळ

JR NTR birthday : काही दिवसांपूर्वी जर 'ज्युनियर एनटीआर'(junior NTR) हे नाव घेतलं असतं तर कदाचित आपल्यापैकी अनेकांना ते नवीन वाटलं असतं पण 'आरआरआर' (RRR) आला आणि ज्युनिअर एनटीआर हे नाव जगभरातल्या कानाकोपऱ्यात पोहचलं. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या या अभिनेत्याने सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. आज आपल्यापुढे सुपरस्टार म्हणून वावरणाऱ्या या अभिनेत्यावर एकेकाळी बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज ज्युनिअर एनटीआर चा वाढदिवस. त्यानिमित्ताने ही खास आठवण... (jr NTR marriage controversy )

अभिनेता नंदमुरी तारक रामा राव (actor nandmuri tarak rama rao) म्हणजेच 'ज्युनियर एनटीआर'चा आज ३९ वा वाढदिवस. 'स्टूडेंट नं 1', 'राखी', 'सिम्हाद्री', 'टेंपर', 'प्रेमाथो', 'जनता गैराज' आणि 'बादशाह' यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या ज्युनियर एनटीआरने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. आणि नुकत्याच येऊन गेलेल्या आरआरआर ने तर अक्षरशः वेड लावलं. या सुरपस्टारवर अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याप्रकरणी बालविवाहाचा आरोप झाला होता.

ही गोष्ट आहे २०११ ची. ज्युनियर एनटीआरने एका तेलगू चॅनलच्या मालकाची मुलगी लक्ष्मी प्रणाथी सोबत लग्नगाठ बांधायचं ठरवलं. प्रणाथी ही उद्योगपती नारने श्रीनिवास राव यांची मुलगी. तिची आई ही आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची भाची. २०११ साली त्यांनी साखरपुडा केला . पण त्यावेळी लक्ष्मी फक्त १७ वर्षांची होती. त्यामुळे या लग्नाची वार्ता कळताच विजयवाडामधील वकील सिंगुलुरी शांति प्रसाद यांनी ज्युनिअर एनटीआर विरोधात बालविवाह कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली.

एनटीआर, चंद्राबाबू नायडू, श्रीनिवास राव यांना या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र लवकरच प्रणाथी लग्नापर्यंत 18 वर्षांची होत असल्याचं सांगत तिच्या कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आणि या वादावर पडदा पडला. पुढे काही महिने वाट पाहून ५ मे २०११ मध्ये लक्ष्मीसोबत विवाह केला. त्यावेळेस लक्ष्मीला १८ वर्ष पूर्ण झाली होती.सध्या ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी सुखाने संसार करत असून त्यांना दोन मुलं आहेत. आणखी एका कारणावरूनही हे लग्न गाजलं होतं.असं म्हणतात हे लग्न दक्षिण भारतातल्या सर्वांत महागड्या लग्नांपैकी एक होतं. या लग्नावर त्यावेळी १०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Aarti : नवरात्री स्पेशल श्री दुर्गा मातेच्या 5 खास आरत्या, खरे भक्त असाल तर नक्की वाचा

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार! नवीन सुविधा काय असणार? खर्चाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

SCROLL FOR NEXT