RRR Movie esakal
मनोरंजन

RRR: आरं देवा, HD प्रिंट ऑनलाईन लीक, दिग्दर्शक चिंतेत

ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होते त्या आरआरआरला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद (Entertainment News) मिळताना दिसतो आहे.

युगंधर ताजणे

RRR Movie: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होते त्या आरआरआरला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद (Entertainment News) मिळताना दिसतो आहे. दिग्दर्शक आर आर राजामौली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एनटीआर ज्युनियर, राम चरण, आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि (Ramcharan) अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत (Bollywood Movies) असणाऱ्या आरआरआरला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आज हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याला काही ठिकाणी गालबोटही लागले आहे. कित्येक प्रेक्षकांनी त्याचे थिएटरमध्ये व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या निर्माते आणि दिग्दर्शक यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे कारण राजामौली यांचा आरआरआर हा एचडी प्रिंटमध्ये ऑनलाईक लिक झाला आहे. त्याचा मोठा फटका दिग्दर्शक आणि निर्माते यांना बसला आहे. या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या व्हिएफएक्सचं कौतूक होतंय. तसेच दोन्ही अभिनेत्यांचे मोठ्या प्रमाणात कौतूकही होताना दिसत आहे. अशावेळी ऑनलाईन चित्रपट लिक होणे हे अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी धक्कादायक बाब मानली जात आहे. आरआरआरच्या मेकर्ससमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. त्याचा तोटाही या चित्रपटाच्या मेकर्सला करावा लागला होता. अशावेळी 150 हून अधिक कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या आरआरआरला यश मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आरआरआरच्या टीमनं मोठ्या प्रमाणात प्रमोशन सुरु केलं होतं. त्यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना हाताशी धरलं होतं. यात अभिनेता सलमान खान, आमीर खान यांनी आरआरआरच्या प्रमोशनसाठी पुढाकार घेतल्याचे दिसुन आले होते. पहिल्यांदाच बॉलीवूडच्या कलाकारांना घेऊन टॉलीवूडच्या एखादया चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी हा सिनेमा एच डी प्रिंटमध्ये ऑनलाईन लिक झाल्यानं त्याच्या कलेक्शनवरती मोठा फरक पडू शकतो. अशी भीती चित्रपट समीक्षक, अभ्यासक यांनी वर्तवली आहे. यापूर्वी राधे श्याम आणि अल्लु अर्जुनचा पुष्पा देखील पायरसीचे शिकारी झाले होते. मात्र आरआरआरनं पहिल्याच दिवशी मोठी कमाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी 59 कोटी रुपयांचे बुकींग झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajiraje Chhatrapati: शिवरायांचा उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार, मात्र...; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसरकारकडे मागणी!

Wimbledon 2025 : विम्बल्डनची नवी राणी कोण? स्विअतेक-ॲनिसिमोवा एकेरीची अंतिम लढत

Misfire: मित्राला पिस्टल दाखवत होता, अचानक सुटली गोळी; समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील घटना

Maharashtra Sahitya Parishad : ‘मसाप’ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; कृती समितीकडून धर्मादाय आयुक्तांकडे मागणी

Parbhani News: संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू; निवासी शाळेत घटना, दांपत्याविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT