RRR Movie Sakal
मनोरंजन

RRR: ऑस्कर जिंकल्यानंतर जपानमध्ये आरआरआरचा जलवा! मोडले सर्व विक्रम

'RRR'ने जपानमध्ये 80 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यासह हा चित्रपट जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साउथ चित्रपट 'RRR' जगभरात दररोज नवनवे टप्पे गाठत आहे. नुकतेच या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने इतिहास रचला आणि 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ऑस्कर जिंकला. 'नाटू नाटू' या गाण्याने मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपटाच्या या विजयाने संपूर्ण देशाला अभिमान आणि आनंद वाटत आहे.

त्याचवेळी 'आरआरआर'ने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. 'RRR'ने जपानमध्ये 80 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यासह हा चित्रपट जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'RRR' 21 ऑक्टोबरला जपानमध्ये रिलीज झाला होता. तो येथे 200 स्क्रीन्सवर आणि 44 शहरांमध्ये प्रदर्शित झाला. RRR ला जपानमध्ये 31 IMAX स्क्रीन मिळाल्या. पहिल्या दिवसापासूनच जपानमध्ये या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे.

यासोबतच जपानमध्ये चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. जपानमधील थिएटरमध्ये 'RRR' प्रदर्शित होऊन 20 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे.

चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT