RRR movie team helped ukraine artist between war period natu song  sakal
मनोरंजन

Golden Globe: जेव्हा युद्ध काळात RRR च्या टीमनं पाठवले होते युक्रेनियन कलाकारांना पैसे..

आज 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्याने भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.

नीलेश अडसूळ

Golden Globe winner RRR movie song natu natu: सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची.. या चित्रपटाने पुन्हा इतिहास रचला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय मनोरंजन विश्वाची मान उंचावली आहे. अशीच एक अभिमान वाटणारी गोष्ट यानिमित्ताने पाहूया..

(RRR movie team helped ukraine artist between war period natu song )

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने अवघ्या जगाला हादरवून सोडलं होतं. कित्येक लोकांचे निरपराध बळी या युद्धाने घेतले. रशियाने युक्रेन मध्ये हाहाकार माजवला होता. यावेळी RRR चित्रपटाच्या कलाकारांनी युक्रेनच्या कलाकारांना आर्थिक मदत पाठवली होती.

त्यामागेही एक खास कारण आहे. ही युद्ध सुरू होण्याच्या काहीच काळ आधी तिने RRR चित्रपटाच्या 'नाटू नाटू' गाण्याचे चित्रीकरण झाले होते. या सर्व प्रक्रियेत दिग्दर्शक राजामौली यांना तिथल्या युक्रेनियन कलाकारांनी मोठी मदत केली. हेच कलाकार बॅक स्टेज, स्टॉपबॉय म्हणूनच कामाला होते. त्यामुळे RRR शी त्या कलाकारांचे वेगळे नाते जुळून आले.


याच प्रेमाची जाणीव म्हणून युद्ध काळात त्या कलाकारांना मदत पाठवण्याचा निर्णय RRR च्या कलाकारांनी घेतला. अभिनेता रामचरण यानं आपल्या बॉडीगार्डचे काम करणाऱ्या त्या युक्रेनच्या कलाकारांना आर्थिक साह्य केले होते. तर ज्या युक्रेनियन कलाकारांनी आरआरआरमध्ये काम केले त्यांच्या परिवारालाही मदत करण्यासाठी RRR मधील कलाकार पुढे आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT