RRR Oscar 2023 Andra CM YS Jagan Reddy tweet esakal
मनोरंजन

RRR Oscar 2023 : 'तुम्ही तेलुगू झेंडा फडकवला!' आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बोलले! अदनान सामीचा संताप, 'अजुन किती...'

ऑस्करच्या सोहळ्यात नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्यानंतर देशभरातून कौतूकाचा वर्षाव RRR च्या टीमवर झाला.

सकाळ डिजिटल टीम

RRR Oscar 2023 Andra CM YS Jagan Reddy tweet : टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटानं ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. एकीकडे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे RRR चर्चेत आला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला असताना सगळा देश त्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना या चित्रपट आणि गाण्याला प्रादेशिक वादाचा रंग चढत असल्याचे दिसून आले आहे.

ऑस्करच्या सोहळ्यात नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्यानंतर देशभरातून कौतूकाचा वर्षाव RRR च्या टीमवर झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राजामौलींचे कौतूक केले होते. कालपासून राजामौली आणि त्यांच्या RRR च्या टीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. यात काहींनी ऑस्कर कमिटीनं राजामौलींचा अपमान केल्याची टीका केली होती. त्यांना शेवटच्या रांगेत का बसवण्यात आले असे चाहते आणि नेटकऱ्यांचे म्हणणे होते.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

यासगळ्यात आता आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या ट्विटमधून RRR चे कौतूक केले. राजामौलींचे अभिनंदन करताना त्यांनी केलेलेल्या ट्विटमध्ये तेलगू झेंडा उंचावण्याचे काम तुम्ही सगळ्यांनी केले आहे.अशी प्रतिक्रिया दिली आहे.त्यानंतर सोशल मीडियावर त्या प्रतिक्रियेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्या ट्विटवर टीका केली आहे. त्यातच प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मला तुम्हा सगळ्यांचा गर्व आहे. तुम्ही केलेली कामगिरी मोठी आहे. तुमच्या कामगिरीनं आनंद झाला आहे. आपलं तेलगू गाणं हे आपली परंपरा आणि संस्कृती दर्शविण्याचे काम करते. त्याला जागतिक पातळीवर नेऊन त्याचा गौरव करण्याचे काम तुम्ही केले आहे.याचा गर्व आहे. तुम्ही कौतूकास पात्र आहात, अशाप्रकारे तुम्ही तेलगू झेंडा उंचावण्याचे काम केले आहे. अशी प्रतिक्रिया रेड्डी यांनी केली होती.

RRR Oscar 2023

रेड्डी यांनी आपले ट्विट राजामौली, संगीतकार किरवानी, याशिवाय अभिनेता ज्युनिअर एनटीआर, रामचरण यांना टॅग केले होते. यानंतर अदनान सामीनं रेड्डी यांच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, रेड्डी यांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया देणं चुकीचे आहे. त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांची संकुचित वृत्ती दिसून येते. तुम्ही पुन्हा प्रादेशिक वाद निर्माण करता आहात. अशा शब्दांत सामीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT