RRR Oscar 2023 esakal
मनोरंजन

RRR Oscar 2023 : एकदा का होईना 'ब्रॅड पिट' सोबत काम करायचंय! ऑस्कर विजेता एनटीआर असं का म्हणाला?

ऑस्कर विजेत्या आरआरआरमधील ज्युनिअर एनटीआरची मोठी हवा आहे. त्याच्या नाटू नाटू गाण्यातील नृत्याचे केवळ भारतात नाहीतर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कौतूक झाले आहे.

युगंधर ताजणे

RRR Oscar 2023 : ऑस्कर विजेत्या आरआरआरमधील ज्युनिअर एनटीआरची मोठी हवा आहे. त्याच्या नाटू नाटू गाण्यातील नृत्याचे केवळ भारतात नाहीतर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कौतूक झाले आहे. अशातच त्यानं ऑस्कर सोहळ्यामध्ये जी वेशभूषा केली होती त्याचेही प्रशंसा झाली. एका पत्रकारानं त्याला त्यासंबंधी विचारणाही केली होती. त्यावर माझ्या चित्रपटामध्ये वाघ होता. मी वाघ असणाऱ्या भारताचे प्रतिनिधीत्व करतो. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

यासगळ्यात ज्युनिअर एनटीआरच्या आणखी एका प्रतिक्रियेची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. काहीही झालं तरी आपल्याला हॉलीवूडमधील त्या अभिनेत्याची भूमिका करायची आहे. अशी इच्छा एनटीआरनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती. तो अभिनेता कोण याविषयी त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट असे त्या अभिनेत्याचे नाव एनटीआर त्याचा जबरी चाहता आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

एनटीआर हा भारतातील प्रसिद्ध अभिनेता आहे. टॉलीवूडमध्ये त्यानं आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चाहत्यांना प्रभावित केले आहे. दक्षिण भारतामध्ये एनटीआरचा खास चाहतावर्ग आहे. त्यानं आरआरआऱमध्ये जी भूमिका केली त्यावरुन चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. भारतातील सर्वात प्रभावित करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून त्याचे नाव घेता येईल. रामचरण सोबत एनटीआरनं देखील त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ज्युनीअर एनटीआरला हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट फार आवडतो. काहीही झालं तरी एकदा का होईना त्याच्यासोबत काम करण्याची त्याची फार इच्छा आहे. असे त्यानं म्हटलं आहे. एनटीआर जेव्हा ऑस्करच्या रेड कार्पेटवर होता त्यावेळी त्याला मीडियानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं मोकळेपणानं उत्तरं दिली आहेत. आरआरआरमध्ये त्यानं कोमराम भीम नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

त्याचं काय आहे की, मी जेव्हा ब्रॅड पिटनं ट्रॉयमध्ये साकारलेला अखिलिस पाहिला तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो. त्यानं केलेली भूमिका खूपच भावली. तो चांगला कलाकार आहे. ब्रॅड पिटसोबत मला काम करायला खूपच आवडेल. त्याच्यासाठी मी हेक्टर व्हायला तयार आहे.असेही एनटीआरनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT