Mithun Chakraborty 
मनोरंजन

मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर? आरएसएसच्या बड्या व्यक्तीशी भेट

सकाळ ऑनलाइन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करणार की काय, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

या भेटीबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले, "मोहन भागवत यांच्याशी माझं अध्यात्मिक कनेक्शन आहे. मी त्यांना लखनऊमध्ये भेटलो होतो आणि तेव्हा मुंबईत कधी आलात तर माझ्या घरी आवर्जून या असं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली." यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना फेटाळलं. "कोणतेही अंदाज वर्तवू नका. त्याबद्दल अद्याप काहीही चर्चा झाली नाही," असं ते पुढे म्हणाले. 

२०१९ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली होती. २०११६ पर्यंत ते तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभा सदस्य होते होते. मात्र आरोग्याच्या कारणांमुळे सदनात सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते राजकारणापासून दूर आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT