Rubina Dilaik Announce Pregnancy Abhinav Shukla After 5 Years Of Marriage photos viral  SAKAL
मनोरंजन

Rubina Dilaik Pregnancy: अखेर रुबीनानं सांगितलचं! रुबीना अन् अभिनवच्या घरी येणार छोटा पाहूणा!

रुबीनाने सोशल मिडीयावर तिची प्रेग्नंसी जाहीर केलीय

Devendra Jadhav

Rubina Dilaik Pregnancy News: गेल्या अनेक दिवसांपासुन गरोदरपणाच्या चर्चांबद्दल हो हो, नाही नाही म्हणणाऱ्या रुबीना डिलैकने अखेर आज ती गरोदर असल्याचं जाहीर केलं.

रुबीनाने नवरा अभिनव शुक्लासोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करुन सर्वांना ही गुड न्युज दिली. रुबीनाने गुड न्यूज देताच तिच्या फॅन्सनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

(Rubina Dilaik Announce Pregnancy Abhinav Shukla After 5 Years Of Marriage photos viral)

अखेर रुबीनाने गुड न्यूज दिलीच

रुबीनाच्या फोटोंमध्ये, रुबिना डीलैकने काळ्या रंगाच्या को-ऑर्डरच्या सेटमध्ये कपडे परिधान केले आहेत. आणि तिचा पती अभिनव शुक्ला तिच्यासोबत पोज देताना दिसत आहे.

फोटोंसोबत, तिने एक कॅप्शन देखील लिहीले आहे, "आम्ही वचन दिले होते की, आम्ही डेटिंग सुरू केल्यापासून एकत्र जग एक्सप्लोर करू. पुढे लग्न केले पण आता आम्ही एकत्र फिरणार. एक कुटुंब म्हणून. लवकरच छोट्या ट्रॅव्हलरचे आम्ही स्वागत करणार आहोत!"

म्हणुन रुबीना परदेशात गेली

रुबिना डीलैक सध्या तिचा पती अभिनव शुक्ला आणि सासरच्या मंडळींसोबत अमेरिकेत सुट्टी घालवत आहे. यापूर्वी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, रुबीना तिच्या कुटुंबासोबत परदेशात गेली आहे कारण तिला तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाचे प्रत्येक क्षण जगायचे आहेत. याशिवाय तिला पापाराझीपासून दूर राहायचे होते.

रुबीनाने तिच्या गरोदरपणाची घोषणा अधिकृत केल्यानंतर, चाहत्यांनी अभिनव - रुबीनाचे अभिनंदन केले.

काही दिवसांपुर्वी व्हायरल झालेला रुबीनाचा फोटो

काही दिवसांपुर्वी रुबिना डीलैकने तिचा वाढदिवस पती अभिनव शुक्लासोबत साजरा केला. फोटोमध्ये रुबिना आणि तिचा पती अभिनव गणेशाच्या मूर्तीसमोर प्रार्थनेत मग्न आहेत. लोकांचं लक्ष रुबिनाच्या ड्रेसकडे गेलं. ज्यामध्ये सगळ्यांना तिचा बंप स्पष्ट दिसत होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तू माझ्या प्रिय अभिनवसाठी प्रत्येक वर्ष खास बनव." अशी पोस्ट रुबीनाने केलीय.

आता रुबीना आई होणार असं जाहीर केल्यावर, तिच्या फॅन्सनी आनंदाचा वर्षाव आलाय.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT