मनोरंजन

विकी कौशल-कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा?

गेल्या कित्येक दिवसांपासून कतरिना आणि विकी डेट करत असल्याची चर्चा सुरू होती.

प्रियांका कुलकर्णी

गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. या दोघांनी कधीच या चर्चांवर उत्तर दिलं नाही. कतरिना आणि विकी यांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याच्याही चर्चा होत्या. 'शेरशाह' या चित्रपटाच्या स्क्रिनींगला कतरिना आणि विकीने एकत्र हजेरी लावली होती. नुकताच या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

विकी आणि कतरिनाने अजून त्यांच्या साखरपुड्याची अधिकृतपणे घोषणा केली नाही. पण सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, 'कतरिना आणि विकीच्या साखपुड्याची चर्चा सुरू आहे. आपण त्यांनी अधिकृतपणे सांगण्याची वाट पाहूयात.'

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. या मुलाखतीमध्ये हर्षवर्धनला इंडस्ट्रीतील कोणत्या रिलेशनशिपच्या चर्चांना तो खरं मानतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हर्षवर्धन म्हणाला, "विकी आणि कतरिना हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. हे खरं आहे. पण आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल का? माहित नाही." विकी कौशलने नुकतीच कतरिनाची तिच्या घरी भेट घेतल्याचं वृत्तंही 'ई टाइम्स'ने दिलं होतं. कतरिनाच्या इमारतीखाली पार्क केलेल्या विकीच्या कारचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कतरिनाने नुकताच एक मीरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या विकी कौशल दिसत होता. सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांमुळे कतरिनाने तो फोटो डिलीट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: किरकोळ प्रकरण पण सर्वोच्च न्यायालयाचा तब्बल १४ वर्षांनी निकाल; अंतिम निर्णयापूर्वीच दोन दोषींचा मृत्यू... काय आहे प्रकरण?

Kolhapur Crime: इचलकरंजीत प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींवर अत्याचार; तरुण ताब्यात व भावास मारहाण, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश!

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Parbhani: जोरदार पावसामुळे अर्धा रस्ता जलमय; परभणीत राष्ट्रीय महामार्ग, वसाहतीत पाणीच पाणी

Pune News: आईच्या निधनाचा धक्का असह्य; पुण्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एकाच दिवशी माय-लेकालाच अखेरचा निरोप..

SCROLL FOR NEXT