Rupali Ganguly spoke about how her father Anil Ganguly. Google
मनोरंजन

धर्मेंद्रमुळे रुपाली गांगुलीच्या वडिलांना राहतं घर विकावं लागलं होतं...

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली ही ज्येष्ठ निर्माते अनिल गांगुली यांची कन्या आहे.

प्रणाली मोरे

सध्या हिंदी टेलीव्हिजनवरील 'अनुपमा' मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली गांगुली(Rupali Ganguly)नं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांच्याविरोधात मोठं भाष्य केलं आहे. आपले वडिल निर्माते अनिल गांगुली(Anil Ganguly) यांना धर्मेंद्र यांच्या सिनेमामुळे राहतं घर विकायला लागलं होतं असं रुपाली गांगुलींन म्हटलं आहे. तिनं एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला आहे. ती म्हणाली,''धर्मेंद्र यांच्या त्या सिनेमानं तयार व्हायला पूर्ण चार वर्ष घेतली होती. आणि या सिनेमानं आमच्या संपू्र्ण कुटुंबाला दुःखाच्या झळा बसवल्या. ती पुढे म्हणाली,खरं तर हा सिनेमा वेळेत पू्र्ण होणं माझ्या वडिलांची गरज होती,पण त्यानं दगा दिला. आणि त्यामुळे खूप वाईट पद्धतीनं आलेल्या प्रसंगांना माझ्या वडिलांना सामोरं जावं लागलं''.

अनिल गांगुली यांच्या १९९१ मध्ये आलेल्या 'दुश्मन देवता' सिनेमात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात डिंपल कपाडिया,आदित्य पांचोली,सोनम,गुलशन ग्रोव्हर देखील होते. दिवंगत बप्पी लाहिरी यांनी या सिनेमाची गाणी संगीतबद्ध केली होती. पिंकव्हिला वेबसाईटला मुलाखत देताना रुपाली गांगुली म्हणाली,''निर्माते अनेकदा एखादा सिनेमा ब नवताना त्यांची घरं विकतात. पण जेव्हा सिनेमा फ्लॉप होतो आणि त्यासाठी तुम्ही तुमचं राहतं घर विकलेलं असता तेव्हा जी वाईट परिस्थिती ओढवते ती आम्ही अनुभवली आहे. माझे वडिल धर्मेंद्र सोबत जेव्हा सिनेमा बनवत होते तेव्हा त्यांना तो लवकर पूर्ण करायचा होता काहीही करुन पण त्या सिनेमानं पू्र्ण व्हायला ३ ते ४ वर्ष घेतली.खरं तर सिनेमा लवकरात लवकर पू्र्ण करणं ही माझ्या वडीलांची खासियत होती. त्यांनी साहेब सिनेमा फक्त ४० दिवसांत पूर्ण केला होता''.

''फिल्मसिटीत त्या सिनेमाचा सेट लागला होता. आम्ही सिनेमात जेव्हा 'एक्स्ट्राज्' लहान मुलांची आवश्यकता असायची तेव्हा त्याच्यात उभं राहायला हमखास यायचो. पण या धर्मेंद्र यांच्या सिनेमानं चार वर्ष पूर्ण करायला लावली आणि शेवटी आम्हाला खूप मोठा तोटा त्याचा सहन करावा लागला. पण असो,आयुष्यात चढ-उतार असतातच. यश मिळालं तर कधीतरी अपयशाचाही सामना करावा लागतोच''. रुपाली पुढे आपल्या मुलाखतीत म्हणाली,''आमचं मध्यम वर्गीय कुटुंब. माझ्या वडिलांनी आयुष्यात खूप स्ट्रगल पाहिलंय. कलकत्ताहून ते मुंबईत आले,त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांनी फुटपाथवर राहून काढले. नंतर ते जगजीत सिंग आणि अशा मोठ्या दिग्गजांसोबत रुम शेअर करुन रहायचे. ते सर्वांसाठीच स्ट्रगलचे दिवस होते. माझ्या वडिलांनी खूप कष्ट केलेयत आणि त्यातनं ते पुढे आले''.

'अनुपमा' या मालिकेमुळे रुपाली आज घराघरात पोहोचली आहे. मराठी 'आई कुठे काय करते' या मालिकेवरच 'अनुपमा' चं कथानक आधारित आहे. पण याआधी रुपालीनं अनेक सिनेमा-मालिकेत अगदी विनोदी धाटणीच्या मालिकांमधनंही स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिनं 'साहेब','मेरा यार मेरा दुश्मन' आणि 'अंगारा' अशा सिनेमांमधून काम केलं आहे. तसंच 'साराभाई vs साराभाई' ही तिची गाजलेली आणखी एक हिंदी मालिका. 'कहानी घर घर की','काव्यांजली','बा बहू और बेबी','आपकी अंतरा' आणि 'अदालत' या मालिकांमधनं रुपालीनं प्रेक्षकांची मनं जिकंलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT