Rutuja Bagwe, rutuja bagwe news, rutuja bagwe house, rutuja bagwe hot photos SAKAL
मनोरंजन

Rutuja Bagwe: 'अनन्या' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वतःचं घर. इमोशनल होत म्हणाली...

या फोटोत ऋतुजाच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत

Devendra Jadhav

Rutuja Bagwe News: स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं हेच स्वप्न पूर्ण झालंय. हि अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नवीन घराचा फोटो शेयर केलाय.

या फोटोत ऋतुजाच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत. न्यू होम, न्यू ऍडव्हेंचर असं किचेन या किल्ल्यांना दिसत आहेत. या चावीमागे ऋतुजाच्या नवीन घराचा दरवाजा दिसत असून त्यावर ऋतुजा आर बागवे असं नाव दिसतंय.

(rutuja bagwe buy new home and fullfill her dream)

ऋतुजा बागवेने सोशल मीडियावरच नवीन घर घेतानाचा व्हिडिओ शेयर केलाय. यात व्हिडिओत नवीन घराची चावी घेताना ऋतुजा अत्यंत आनंदात दिसतेय. याशिवाय ऋतुजाने नवीन घरात आई बाबांचं स्वागत केलंय. ऋतुजाने घरात गणेशपूजा केलीय. ऋतुजाच्या आई बाबांनी लाडक्या लेकीचं कौतुक केलंय. आई बाबांनी ऋतुजाचा पापा घेऊन लेकीचं कौतुक केलंय

ऋतुजाने हा व्हिडिओ शेयर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात कि... शाळेत असताना बाबा ५रू. pocket money द्यायचे. ३रू. खर्च करुन २रू. piggy bank मधे ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५रू. piggy bank मधे टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, small sacrifices, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं.घर आणि घराला घरपण देणारी माझी माणसं.. अशाप्रकारे ऋतुजाने तिच्या भावना व्यक्त केल्यात.

नांदा सौख्य भरे या मालिकेतून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अनन्या नाटकातून ऋतुजाला खरी प्रसिद्धी मिळाली. अनन्या नाटकातून ऋतुजाने सुंदर अभिनय केला. दिव्यांग मुलीची भूमिका रंगभूमीवर साकारून ऋतुजाने सर्वांचं मन जिंकलं. या भूमिकेमुळे ऋतुजाने अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं. आता ऋतुजाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर घर घेतल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला आनंद झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT