ruturaj gaikwad girlfreind utkarsha with ipl trophy Photo viral Marathi Actress Sayali Sanjeev Commented viral  Esakal
मनोरंजन

Ruturaj Gaikwad: ऋतुराजने शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो, सायली म्हणाली, तुम्हा...

Vaishali Patil

Sayali Sanjeev Comment on Ruturaj Gaikwad :आयपीएल 2023 संपली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.

अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन चेंडूत 10 चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. अन् त्यानंतर चेन्नईनं ट्रॉफिवर नाव कोरलं.

सर्वत्र चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचीच चर्चा सुरु आहे. त्याच्या संघाच कौतुक होत असतांनाच याच संघातील एक खेळाडू वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तो खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड. Chennai Super Kings


(Ruturaj gaikwad girlfreind utkarsha with ipl trophy Photo viral Marathi Actress Sayali Sanjeev Commented viral)

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहे. अशातच ऋतुराजने गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत आयपीएलच्या ट्रॉफी सोबत फोटो काढला आहे.

ऋतुराज हा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टला त्याने, 2 VVIPs OF MY LIFE अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच 'माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे', असं म्हणत त्याने देवाचे आभार मानले होते. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

मात्र आता पुन्हा हा फोटो चर्चेत आला त्याच कारण म्हणजे ऋतुराजच्या या फोटोवर सायली संजीवने केलेल्या प्रतिक्रियेमुळे. सायलीने ऋतुराजला आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षाला खुप शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा', अशी कमेंट सायली संजीवने या पोस्टला केली आहे. या कमेंट तिने या दोघांना टॅग केलं आहे.

याआधी ऋतुराज आणि सायली संजीव यांच्या लिंक अपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मे २०२१ मध्ये सायली संजीवसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे दोघांचं अफेयर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या अफेयरमुळे खुप चर्चाही झाली होती, मात्र नंचर सायलीने या आम्ही केवळ चांगले मित्र आहोत असं म्हणत या बातमीचे खंडण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

Mumbai-Bengaluru Vande Bharat: मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’ पुणेमार्गेच; तिकिटाचे दर राजधानीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त असणार..

Wardha News: पालिकेच्या स्वच्छता विभागाची शहरात मान्सूनपूर्व मोहीम; स्वच्छता सभापतींची नियोजनबद्ध आखणी : शहरातील नाले झाले परत प्रवाहित

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला; वाढते तेलदर आणि रुपयाच्या घसरणीने बाजार हादरला

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर यांना सीबीयाने घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT