Sabu Pravadas Malayalam art director passes away following injuries in a road accident  SAKAL
मनोरंजन

Sabu Pravadas: धक्कादायक! सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक सबु प्रवदास यांचा अपघाती मृत्यू

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक सबु प्रवदास यांचं निधन झाल्याने शोक व्यक्त केला जातोय

Devendra Jadhav

Sabu Pravadas Passed Away News: प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि ग्राफिक डिझायनर साबू प्रवदास यांचं निधन झालंय. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासुन ते जीवनाशी झुंज देत होते. पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपुर्वी त्यांचा भीषण अपघात झाला होता. काल शुक्रवारी पहाटे त्यांना कारने धडक दिली होती. त्यामुळे तिरुवअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

(Sabu Pravadas Malayalam art director passes away following injuries in a road accident)

केरळीयम कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात तिरुअनंतपुरम सबु आले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना गाडीने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

प्रसिद्ध प्रवदा स्टुडिओचे मालक दिवंगत प्रवदा सुकुमारन यांचा तो मुलगा. टायगर सलीम या चित्रपटाद्वारे त्यांनी मनोरंजन विश्वात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

याशिवाय राजाविंते माकन, वझियोरक्कझचकल, मनू अंकल, पार्वती परिणयम्, लेलम, पथराम, अमृतम, रन बेबी रन यांसारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शन केले. (Latest Marathi News)

केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, फिल्म अकादमी चित्रपट महोत्सवासाठी पोस्टर आणि लोगोसह त्यांनी अनेक उल्लेखनीय डिझाइन्स तयार केल्या आहेत. त्यांनी दोन कादंबऱ्या आणि 'सिनेमायुदे चरित्रपुस्तकम' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

ते चित्रपट तंत्रज्ञांची संघटना असलेल्या FEFKA च्या संस्थापकांपैकी एक आहेत. कला दिग्दर्शक संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सबु यांच्या दुर्दैवी निधनाने मल्याळम मनोरंजन विश्व शोकसागरात बुडालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT