sachin pilgaonkar cook special chicken dish for daughter shriya actor shared memory in kon honar crorepati show on sony marathi  sakal
मनोरंजन

Sachin Pilgaonkar: आधी बाप, मग अभिनेता! लेकीसाठी केली 'अशी' गोष्ट जी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान..

सचिन पिळगावकरांनी फक्त लेकीसाठी केली 'ती' गोष्ट.. वाचाच..

नीलेश अडसूळ

sachin pilgaonkar: मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव म्हणजे 'सचिन पिळगावकर'. अनेक चित्रपट, शेकडो भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. मराठीच नव्हे तर हिंदीतही त्यांचे मोठे स्थान आहे.

मराठीत त त्यांना अभिनयाचा महामेरू म्हंटलं जातं. वयाची साठी ओलांडूनही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. आजही ते त्याच उमेदीनं काम करत असतात. त्यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे.

त्यांच्या पाठोपाठ त्यांची कन्या श्रिया पिळगावकर देखील मनोरंजन क्षेत्रात पाय रोवते आहे. मराठीत तिचा फारसा वावर नसला तरी बॉलीवुड आणि वेब दुनियेत तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नुकतेच ते सोनी मराठी वरील 'कोण होणार करोडपती' या खेळासाठी एकत्र आले. यावेळी सचिन यांनी आपल्या लेकीसाठी केलेली एक खास गोष्ट या मंचावर उलगडली.

(sachin pilgaonkar cook special chicken dish for daughter shriya actor shared memory in kon honar crorepati show on sony marathi )

‘कोण होणार करोडपती’मध्ये आजच्या म्हणजे शनिवार 3 जूनच्या ‘विशेष भागात' सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन आणि श्रिया हा खेळ खेळणार आहेत.

या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे. आज रात्री हा भाग प्रक्षेपित होणार असून या भागात यांनी मनसोक्त गप्पा मारल्या, काही किस्से सांगितले. या बाप-लेकीबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.

याच भागात सचिन पिळगावकर यांनी एक किस्सा सांगितला, सचिन यांनी आपल्या आयुष्यात कधीच जी गोष्ट केली नाही ती लेकीसाठी केली. तीच आज तुम्हाला सांगणार आहोत...

या भागात सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना सचिन पिळगावकर म्हणाले, ''मी आयुष्यात कधीच किचन मध्ये गेलो नाही. मला स्वयंपाक करता येत नाही. परंतु केली श्रियासाठी.. माझ्या लेकीसाठी मी पहिल्यांदा किचन मध्ये पाऊल ठेवलं.''

''तिच्यासाठी मी खास चिकन बनवलं होतं. चिकन इन हनी.. केवळ चिकन बनवलं नाही तर छान भात वगैरे बाजूला ठेवून पूर्ण डिश सजवली. त्यावर लिंबूही पिळलं. ते मला छान जमतं, कारण आमचं आडनावच पिळगावकर आहे.'' असा खास किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT