Saif Ali Khan & Nawazuddin Siddiqui
Saif Ali Khan & Nawazuddin Siddiqui Google
मनोरंजन

'सेक्रेड गेम्स'आता मराठीत;सरताज सिंग,गायतोंडे,काटेकर कोण?

प्रणाली मोरे

नेटफ्लिक्स(Netflix) वर प्रदर्शित झालेली हिंदी भाषेतील 'सेक्रेड गेम्स' वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यातील सैफ अली खान (Saif Ali Khan),नवाझुद्दिन सिद्दीकी यांच्या भूमिकांसोबतच लक्षात राहिला तो मराठमोळ्या जितेंद्र जोशीनं साकारलेला काटेकर. याच्या दोन्ही सिरीज तितक्याच चालल्या. आता ही सिरीज मराठीत येतेय पण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ती आपल्या भेटीस येत आहे. चला जाणून घेऊया मराठीतला सेक्रेड गेम्स नक्की कसा-कुठे भेटीस येत आहे. तर 'सेक्रेड गेम्स'(Sacred Games) या तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता मराठीत 'श्राव्यरूपात' स्टोरीटेलने आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे.

Marathi Audiobook-Sacred Games poster

काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही 'सेक्रेड गेम्स' पाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आली, ती कादंबरी आता 'स्टोरीटेल' मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात 'सेक्रेड गेम्स' भाग १ व २ ची लज्जतदार कहाणी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

'सेक्रेड गेम्स'ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच 'सेक्रेड गेम्स' कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसली, तर 'स्टोरीटेलवर' ऐकताना त्यातला एकूण एक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे. 'सेक्रेड गेम्स' चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता! प्रख्यात भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली 'सेक्रेड गेम्स' ही क्राईम थ्रिलर कादंबरी 'स्टोरीटेल' मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT