sai lokur dohale jevan viral video marathi actress  SAKAL
मनोरंजन

Sai Lokur: मुलगा की मुलगी? कोण येणार सईच्या घरी? डोहाळेजेवणाचा व्हिडीओ व्हायरल

सई लोकुरचा डोहाळेजेवणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Sai Lokur Dohale Jevan Video: सई लोकुर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. सई लोकुरने काहीच दिवसांपुर्वी ती गरोदर असल्याची गुड न्युज सर्वांना सांगितली. सईने गेले अनेक दिवस बेबी बंप दाखवत तिचं खास फोटोशुट केलं आहे.

अशातच सई लोकुरने डोहाळेजेवणाचा खास व्हिडीओ शेअर केलाय. यात तिच्यासमोर खीर आणि गुलाबजामच्या वाट्या ठेवल्या होत्या. त्यात सईने कोणती वाटी उचलली पाहा.

(sai lokur dohale jevan viral video marathi actress)

गुलाबजाम की खीर? सईने कोणती वाटी उचलली?

सई लोकुरने सोशल मीडियावर डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर केलाय. यात तिच्याशेजारी तिचा पती तीर्थदीप रॉय बसलेला दिसतो. सईच्या समोर दोन वाट्या ठेवल्या असतात.

एका वाटीत गुलाबजाम असतो तर दुसऱ्या वाटीत खीर. सई वाटी उचलायला जाते. तिचे सगळे नातेवाईक मुलगा मुलगा म्हणुन ओरडत असतात. आणि सई वाटी उचलते.

त्या वाटीत खीर असते. आता यावरुन सई गोंडस मुलीला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

सई आणि तिर्थदीपने होणार आई - बाबा

सई लोकूरने काहीच दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिच्यासोबत तिचा नवरा तिर्थदीप रॉय होता.

या व्हिडीओत सईच्या हातात प्रेग्नन्सी कीट पाहायला मिळाली. एकुणच सईने तिच्या फॅन्ससोबत ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. सईच्या सर्व फॅन्सनी तिचं अभिनंदन केलं.

सई आणि तिर्थदीप या दोघांनी २९ नोव्हेंबर २०२० ला लग्न केलं. लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघांच्या आयुष्यात ही गुड न्युज आल्याने दोघे नवरा बायको आनंदी असतील यात शंका नाही.

सई सध्या स्वतःचे अनेक फोटोशुट सोशल मीडियावर शेअर करत असते. सईच्या फोटोवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. सईच्या बाळाची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT