Alia Bhatt Or Sai Pallavi? Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana Esakal
मनोरंजन

Ramayana: आदिपुरुषच्या वादानंतर 'रामायण'मधुन आलियाचा पत्ता कट? 'ही' साउथ अभिनेत्री बनणार सिता

Vaishali Patil

Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana साउथस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे.

या चर्चेचे कारण म्हणजे चित्रपटाशी संबंधित वाद. चित्रपटातील संवाद असो किंवा कलाकारांचा लूक प्रेक्षकांनी या चित्रपटात हजारो चुका काढल्या. बराच वाद झाला आणि विरोधाचा फटका चित्रपटाच्या कमाईवर पडला.

आता 'आदिपुरुष' चित्रपटाच्या अपयशानंतर आता प्रेक्षकांच्या नजरा रामायण या चित्रपटाकडे लागल्या आहेत. आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे लोकप्रिय झालेला दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण सिनेमा तयार करणार आहेत.

त्यामुळे आता प्रेक्षक आणि समिक्षकांच्या नजराही या सिनेमाकडे वळाल्या आहेत. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी या सिनेमात आलिया अन् रणबीर कपुर हे सिता आणि रामाच्या भुमिकेत दिसणार अशी चर्चा होती.

त्यानंतर आदिपुरुषच्या वादानंतर आलियानं या सिनेमातुन काढता पाय घेतला. आलिया या चित्रपटात सितेची भुमिका साकरणार नसल्याचं बोललं जात होत. आता या बातमीने आलिया अन् रणबीरच्या चाहत्यांना धक्का बसला.

(Alia Bhatt Or Sai Pallavi?)

आलिया नाही तर सीतेच्या भूमिकेत कोण?

मिडियाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी रणबीरसोबत आता दुसरी अभिनेत्री शोधली आहे. साऊथची सुंदरी साई पल्लवी हिला या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच बोललं जातं आहे. त्यामुळे या चित्रपटात रणबीर रामाच्या आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिवाळीला चित्रपटाची घोषणा होणार!

समोर आलेल्या माहिती नुसार निर्माते या वर्षाच्या डिसेंबर पर्यंत चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. 'रामायण' चित्रपटाची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर होईल असा अंदाज आहे. 'रामायण'चे निर्माते अल्लू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा ​​असतील. रणबीर कपुर हा अॅनिमल चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT