Actress Sai Tamhankar With Anish Joag Google
मनोरंजन

सई ताम्हणकरचा मिस्ट्री मॅन कोण? चाहत्यांनी दिली 'हिंदुस्थानी भाऊ'ची उपमा

सई ताम्हणकरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रणाली मोरे

मराठीसोबतच हिंदीमध्येही आपल्या अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर(Sai Tamhankar). मराठीतली बोल्ड,ग्लॅमरस अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. आपल्या सिनेमांमुळे सई जितकी लक्षात राहिली तितकंच काही वादांमुळे देखील सई चर्चेत राहिली. आता पुन्हा सोशल मीडियावर तिनं एक फोटो पोस्ट केल्यानं तिची जोरदार चर्चा रंगली आहे,अर्थात यावेळी चांगल्या अर्थाने. आणि तिनं जे काही पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे त्यावरनं वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सईच्या या पोस्टने व्हायरल व्हायला केव्हाच सुरुवात केलीय बरं का.

सई नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या सिनेमांविषयी अपडेट देताना दिसते. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचे ग्लॅमरस फोटोशूटही चाहत्यांसाठी अनेकदा पर्वणी ठरतं. नुकताच तिनं तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्याला कॅप्शन दिलंय की' मी तुला कसं लाजायला भाग पाडते नं!' याबरोबरच सईनं काही हॅशटॅग्ज वापरलेयत. ज्यात #one# saheb# daulatrao असं लिहिलं आहे. आता सईच्या लिखापढीवरुन आणि फोटोवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कुणी म्हणतंय,'सईचा मिस्ट्री मॅन',तर कुणी म्हणतंय,'दौलतराव' तर कुणी थेट त्या फोटोतील व्यक्तिला सईचा 'हिंदुस्थानी भाऊ' असंच नाव देऊन टाकलंय.

सईच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. त्यात प्रिया बापट,प्रार्थना बेहरे,वैभव तत्त्ववादी,सुयश टिळक यांची नावं घेता येईल. अनेकांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट केल्यामुळे आता चाहत्यांसोबत आम्हीही लावलेले तर्कवितर्क खरे आहेत असं वाटतंय बरं. बरं,थोडी मागची-पुढची चौकशी केल्यावर कळलं की सईचा हा मिस्ट्री मॅन म्हणजे मराठी निर्माता अनिश जोग आहे बरं का. त्यानं आणि सईनं मिळून YZ,धुरळा,गर्लफ्रेंड,टाईमप्लीज सारखे सिनेमे एकत्र केले आहेत. प्रिया बापटनं ती पोस्ट अनिशला टॅग केल्यानं हा सगळा उलगडा झाला. थॅंक्स टू प्रिया बापट. असो,सई ताम्हणकरनं पुन्हा नातं जोडायचा निर्णय घेतला तर. सई ताम्हणकरनं २०१३ मध्ये निर्माता अमेय गोसावी सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर दोन-तीन वर्षात त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये अधिकृतरित्या त्यांचा घटस्फोट झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT