Saif Ali khan angry on paparazi Esakal
मनोरंजन

Saif Ali Khan Video: 'आता आमच्या बेडरुममध्ये या..', सैफ अली खान भडकला..जाणून घ्या पूर्ण प्रकरण

सैफ अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यावरनं त्याला अनेकांनी ट्रोलही केलं आहे.

प्रणाली मोरे

Saif Ali Khan Video: सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे बॉलीवूडच्या स्टार कपल्सपैकी एक आहेत. दोघांच्या वयात जवळपास १० वर्षांचे अंतर असले तरी यांच्यातील बॉन्डिंग लोक फॉलो करताना दिसतात.

दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. नुकताच सैफ आणि करीनाचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात पापाराझी त्यांना फोटोसाठी रीक्वेस्ट करताना दिसत आहेत.

त्यावेळी सैफ अली खानच्या थोड्या विचित्र रिअॅक्शननं लोकांना हैराण करून सोडलं आहे. सोशल मीडियावर करिना आणि सैफचा हा व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.(Saif Ali khan angry on paparazi video Viral on Social Media)

विरल भयानीनं नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यात सैफ आणि करीना एकमेकांचा हात हातात धरुन गाडीतून उतरुन आपल्या अपार्टमेंटच्या दिशेने चालत आहेत.

मलायका अरोराच्या आईच्या वाढदिवसाला दोघे गेले होते त्याच पार्टीहून ते परतताना दिसत आहेत. त्यांच्या कारमधून ते उतरतात त्याक्षणीच पापाराझी त्यांना फोटोसाठी डिमांड करताना दिसतात आणि त्यांच्या मागेमागे देखील जातात.

आणि यामुळे सैफ थोडा वैतागलेला दिसतो. खूप वेळ दुर्लक्ष करूनही पापाराझी ऐकत नसल्या कारणानं सैफ त्यांना सरळ म्हणतो,''एक काम करा तुम्ही आमच्या बेडरुममध्येच चला''.

त्यावेळी सैफच्या सोबत असलेली करीना हसताना दिसत आहे. आता करीना नेहमीच पापाराझींचा मान राखत त्यांना फोटोपोझ देताना दिसते पण यावेळी सैफ सोबत असल्यानं तिला देखील थांबता आलं नाही.

आता सैफचा हा भडकलेला अंदाज पाहून या व्हिडीओवर रिअॅक्शन येताना दिसत आहेत.सैफ याआधी देखील एका मुलाखतीत बोलून गेलाय की आपल्या घराबाहेर २४ तास पापाराझी उभे असतात हे त्याला मुळीच आवडत नाही.

पण त्याला वाटतं की त्याच्या तक्रारीमुळे कुणाची नोकरी जाऊ नये म्हणून तो काही अॅक्शन घेत नाही. ''तैमूरला देखील जास्त स्पॉट करू नका,तो एक छोटा मुलगा आहे,स्टार नाही'' असं देखील सैफ म्हणाला होता.

हेही वाचा: बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

या व्हिडीओत सैफने काळ्या रंगाचा कुर्ता आणि सफेद पायजमा घातलेला दिसत आहे. तर करीना कपूरनं काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. दोघं एकत्र खूप छान दिसत आहेत.

फक्त सैफ आणि करीनाच नाही तर त्यांच्या मुलांना देखील पापाराझी खूप हायलाइट करताना दिसतात. खरंतर याआधी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीत सैफ तैमूरचे फोटो काढलेले आपल्याला आवडत नाही असं म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT