Saif Ali Khan, Amrita Singh Divorce Esakal
मनोरंजन

Saif Ali Khan ने अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर शाहरुखचं नाव घेत केलेलं हैराण करणारं वक्तव्य.. म्हणालेला..

सैफ अली खाननं लग्नाच्या १३ वर्षानंतर अमृता सिंगला घटस्फोट दिला होता. त्यानं पोटगी म्हणून अमृताला ५ करोड रुपये दिल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Saif Ali Khan आणि करिना कपूरच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अमृता सिंगपासून विभक्त झाल्यानंतरही तो काही ना काही कारणानं तिच्याशी जोडलेला आहे. सैफ-अमृतानं लग्नाच्या १३ वर्षानंतर घटस्फोट घेतला. तोपर्यंत दोघांना दोन मुले झाली होती.

घटस्फोटानंतर सैफला प्रत्येक महिन्यात अमृताला १ लाख रुपये द्यायचे होते. जोपर्यंत त्यांचा मुलगा इब्राहिम १८ वर्षाचा होत नाही तोपर्यंत सैफला हे पैसे द्यायचे होते. (Saif Ali Khan big statement on shahrukh khan after his divroce with amrita singh)

२००४ साली सैफ अली खाननं अमृता सिंगला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २००५ साली दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता की, ''अमृता सिंगला त्याला ५ करोड रुपये द्यायचे आहेत. ज्यामधील २.५ करोड रुपये त्यानं आधीच दिले आहेत. त्यानंतर सैफनं शाहरुखचं नाव घेत म्हटलं होतं की तो काही शाहरुख खान नाही आहे. त्याच्याजवळ एवढे पैसे नाहीत. पण जेवढे पैसे द्यायचे ठरले आहेत ते तो देणार. उरलेले पैसे तो काहीही करुन अमृताला देणार''.

एवढंच नाही तर त्या मुलाखतीत सैफनं म्हटलं होतं की त्याच्याजवळ जास्त पैसे नाहीत. पण तो काहीही करून अमृताचे पैसे देऊन टाकणार. त्या दिवसांत तो जे काही सिनेमातून,जाहिरातीतून कमावत होता ते त्याच्या मुलांच्या पालनपोषणासाठी देत होता. सैफनं एका मुलाखतीत अमृता सिंगवर आरोप केला होता की ती त्याला सारा आणि इब्राहिमला भेटू देत नाही.

अमृता सिंगपासून वेगळं झाल्यानंतर सैफनं काही वर्षांनी करिना कपूर सोबत लग्न केलं. दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर कपूर कुटुंबाची मुलगी पटौदी खानदानची बेगम बनली. करिना-सैफला दोन मुलं आहेत..तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान. सारा आणि इब्राहिम यांचे आपल्या सावत्रं भावंडांसोबत खास बॉन्ड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT