Saif Ali khan praises smita tambe for her acting
Saif Ali khan praises smita tambe for her acting  
मनोरंजन

Sacred Games 2 : सैफने दिली या मराठी अभिनेत्रीला शाबासकी

वृत्तसंस्था

सेक्रेड गेम्सचे दुसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झाले. या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसून आलीय.

स्मिता तांबेच्या ह्या भूमिकेबद्दल सध्या तिचे खूप कौतुक होत आहे. पण को-स्टार सैफ अली खानने दिलेली कॉम्पलिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. स्मिता ह्याविषयी सांगते, “सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला,  की मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात. चित्रीकरणावेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”

स्मिता साकारत असलेली ‘रमा’, मुंबईतल्या शिवडी मध्ये कुटुंबासमवेत राहणारी, मुळची विदर्भातली दाखवली आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान! अहोरात्र झोकून देऊन काम करणारी! 26/11 च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवली आहे.

नीरज घायवान ह्या दिग्दर्शकासोबतही स्मिताने पहिल्यांदाच काम केले. ती सांगते, “नीरज घायवान खूप शांत दिग्दर्शक आहे. तो खूप शांततेत काम करतो. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेविषयी किंवा एखाद्या सीनविषयी समजावताना भारंभार माहितीने दाबून टाकत नाही. गरजेची असलेलीच माहिती देऊन त्यावर अभिनेत्यालाही काम करून देण्याची मोकळीक देतो. त्यामूळे आपल्या कामावर आपली वेगळी छाप उमटते.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT