Saif Ali Khan & Kareena Kapoor Instagram
मनोरंजन

Saif Ali Khan: 'आपल्याहून खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करा..', पुरुषांना सल्ला देत सैफनं सांगितलं यामागचं कारण

सैफनं पहिलं लग्न आपल्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंगशी केलं होतं तर दुसरं लग्न आपल्याहून १० वर्षांनी लहान करिना कपूरशी केलं आहे.

प्रणाली मोरे

Saif Ali Khan: सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत. दोघांना २ क्यूट मुलंही झाली आहेत. एक हसतं-खेळतं कुटुंब आहे त्यांचं. २०१२ मध्ये करिनासोबत लग्न झाल्यानंतर जवळपास २ वर्षांनी त्यानं एक मुलाखत दिली होती ज्यात त्यानं म्हटलं होतं की करिना कपूरसोबत लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात योग्य निर्णय आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे.

एवढंच नाही तर त्यानं त्यावेळी आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणं गरजेचं का आहे यावर देखील भाष्य केलं होतं.

माहितीसाठी फक्त नमूद करतो की,करिनाशी लग्न करण्याआधी सैफनं स्वतःपेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी लग्न केलं होतं. दोघांच्या नात्याचा शेवट तसा खूपच वेदना देणारा ठरला. त्यांच्यातील भांडण हे चव्हाट्यावर आलं होतं. त्यांची दोन मुलं आहे सारा अली खान आणि इब्राहम अली खान.(Saif ali khan said why all men should marry to much younger and beautiful women)

सैफ अली खानचा जन्म १९७० साली झाला तर करिना कपूरचा जन्म १९८० साली झाला. दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सैफला विचारलं गेलं होतं की,'करिनासोबत लग्न करणं हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे असं वाटतं का?'

यावर त्यानं उत्तर देत म्हटलं होतं की,''हो..यात काहीच डाऊट नाही. मी हे म्हणू शकतो. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे''.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सैफला तेव्हा विचारलं गेलं होतं की,' वयातील अंतर नात्यावर परिणाम करतं का?'

तेव्हा तो म्हणाला होता,''मी सगळ्याच पुरुषांना सल्ला देईन की आपल्यापेक्षा खूप छोट्या आणि सुंदर महिलेशी लग्न करा''.

याागचं कारण सांगत तो म्हणाला होता की पुरुष थोडं उशिराने मॅच्युअर्ड होतात आणि महिला खूप लवकर मोठ्या दिसू लागतात..जणू त्यांचे वय झपाट्याने वाढतेय असे वाटते.

तर करिना कपूरनं करण जोहरच्या शो मध्ये म्हटलं होतं की ऑनस्क्रीन वयानं खूप मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी रोमान्स करायला मला आवडणार नाही कारण तसंही सैफ माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT