saif ali khan 
मनोरंजन

सैफ अली खानची वेबसिरीज 'दिल्ली'चं नाव बदललं, 'या' नावाने होणार रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सैफ अली खान लवकरंच वेबसिरीजमध्ये दिसून येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पंचायत, ब्रीथ: इंटू द शॅडो, पाताल लोक, मिर्झापूर २ या सिरिजीच्या यशानंतर प्रेक्षक आणखी मनोरंजक वेब सिरीज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता ऍमेझॉन प्राईमवर लवकरंच निर्माते अली अब्बास जफर वेब सिरीज आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही पॉलिटिकल ड्रामा असलेली वेबसिरीज आहे. या सिरीजचं नाव पहिले दिल्ली ठेवण्यात आलं होतं मात्र आता हे नाव बदलण्यात आलं आहे. 

सैफ अली खान या वेबसिरीजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. ९ एपिसोड असलेल्या या वेबसिरीजचं नाव पहिले दिल्ली ठेवण्यात आलं होतं जे आता बदलून तांडव असं करण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये सैफ पंतप्रधानांचा मुलाच्या भूमिकेत असेल जो या सिरीजमध्ये व्हिलन असेल. पंंतप्रधानांची खुर्ची मिळवण्यासाठी सैफचं पात्र कोणत्या मर्यादेपर्यंत जाईल हे या सिरीजमध्ये पाहायला मिळेल.

सिरीजमध्ये सैफ अली खान व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धुलिया, कृतिका कामरा, सारा जैन डियास देखील महत्वाच्या भूमिकेत असतील. अली अब्बास जफर या सिरीजच्या माध्यमातून डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे सैफ अली खान सेक्रेड गेम्स २ नंतर पुन्हा एकदा वेबसिरीजमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

नुकतंच सैफने कोरोनाच्या संकटकाळात त्याच्या पहिल्या ऍमेझॉन प्राईम शोसाठी डबिंग देखील केली आहे. अली अब्बास जफरने या वेबसिरीजचं नाव का बदललं गेलं आहे हे अजुन स्पष्ट केलेलं नाही. कदाचित पॉलिटिकल ड्रामा असल्याने निर्मात्यांना वादविवादत अडकायचं नसल्याने त्यांनी हे नाव बदलल्याची चर्चा आहे.   

saif ali khan web series delhi renamed tandava to be released on digital platform next month  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT