Saif Ali Khan's Son Ibrahim And Arjun Rampal's Daughter Mahikaa ,Photo Viral Google
मनोरंजन

Saif Ali Khan चा मुलगा अन् अर्जुन रामपालची मुलगी, 'त्या' फोटोची रंगली चर्चा

माहिका रामपाल आणि इब्राहिम अली खान यांचे लंडनमधील पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

प्रणाली मोरे

सोशल मीडियावर सध्या अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी महिका रामपालची(Mahikaa Rampal) चर्चा जोरदार सुरु आहे. याचं कारण आहे,लंडनमधील एक पार्टी ,जिच्यात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान(Ibrahim Ali Khan)सोबत तिला स्पॉट केलं गेलं. इब्राहिम अली खान काही दिवसांपूर्वी पर्यंत श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत हॅंग आऊट करताना दिला होता,मात्र सध्या त्याचे महिका रामपालसोबत पार्टी करणं मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.(Saif Ali Khan's Son Ibrahim And Arjun Rampal's Daughter Mahikaa ,Photo Viral)


Ibrahim ali khan with mahikaa Rampal (London Party)

इब्राहिम अली खान आणि महिका रामपालचे लंडनमध्ये नाइट आऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये राहून राहून सगळ्यांच्या नजरा महिका रामपालवरच खिळल्या आहेत. महिका,अर्जुन रामपाल आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसियाची मुलगी आहे. महिका रामपाल नेमकं काय करते आणि सोशल मीडियावर तिचं प्रस्थ कसं आहे,चला जाणून घेऊया याविषयी थोडक्यात.

महिका रामपाल,अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मेहरची मुलगी आहे. अर्जुन रामपाल आणि मेहर यांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला होता. अर्जुन Gabriella Demetriades सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. पण तो आपल्या मुली माहिका आणि मायरासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही.

Mahikaa rampal party with her friends at London

माहिका रामपाल सध्या लंडनमध्ये शिकत आहे. ती अजय-काजोल ची मुलगी न्यासा देवगणची खूप चांगली मैत्रिण आहे. दोघींना अनेकदा लंडनमध्ये एकत्र पार्टी करताना पाहिलं गेलंय. माहिका लंडनमध्ये एका फिल्म स्कूलमध्ये शिकत आहे. आता यावरनं हे तर कळतंय की भविष्यात फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करुन ती अभिनय किंवा दिग्दर्शनाकडे नक्कीच वळेल. सध्या मात्र या क्षेत्रात येण्यासाठी ती अभ्यास करतेय आणि अर्थात स्वतःचं ग्रुमिंगही.

गेल्या वर्षी जेव्हा अर्जुन रामपाल लंडनमध्ये गेला होता तेव्हा त्यानं आपली मुलगी माहिका आणि तिच्या फ्रेंड्ससोबत खूप चांगला वेळ घालवला होता. तेव्हा अभिनेत्यानं पोस्ट केली होती,''त्याला आगामी काळात दिग्दर्शक-अभिनयात एन्ट्री करणाऱ्या मुलांसोबत सिनेमाविषयी गप्पा मारताना खूप छान वाटलं. आता माहिका अभिनय निवडेल की दिग्दर्शन की आणखी काही हे तर येणाऱ्या काही दिवसांत कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT