saina poster 
मनोरंजन

"काहीही बरळण्याआधी एकदा विचार करा"; 'सायना'च्या पोस्टरवर दिग्दर्शक अमोल गुप्तेंचं स्पष्टीकरण

स्वाती वेमूल

भारताची आघाडाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित 'सायना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. मात्र पहिल्याच पोस्टरवरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. या पोस्टरमधील शटल सर्व्हिसिंगची चूक लक्षात आणून देत नेटकऱ्यांनी निर्माते-दिग्दर्शकांना प्रचंड ट्रोल केलं. त्यानंतर आता दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी पोस्टरबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचप्रमाणे काहीच विचार न करता ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

अमोल गुप्ते यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यात त्यांनी म्हटलं, 'पोस्टरबाबत डिजिटल मीडियामध्ये खूपच तर्कवितर्क लावले जात आहेत. टेनिस सर्व्हिससारखं दिसतंय, सायनाचा बायोपिक आहे की सानियाचा.. असं बरंच काही म्हटलं जातंय. जर सायना शटल वर हवेत उडवत असेल तर ती एक भारतीय मुलगी आहे जिच्या मनगटावर तिरंगा असून ती सायनाची उंची गाठण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतेय. राहुल नंदा यांची ही कल्पना असून दुर्दैवाने असंयमी जगाला आणि पटकन मत मांडणाऱ्या लोकांना ती अशी समजावून सांगावी लागतेय. काहीही बरळण्याआधीही एकदा विचार तरी करा.'

या बायोपिकमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा ही सायनाची भूमिका साकारतेय. सुरुवातीला अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिका साकारणार होती. तिने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र नंतर काही अडचणींमुळे तिने चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर यामध्ये परिणितीची एंट्री झाली. गुरुवारी परिणितीने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये देशात मुलामुलींमध्ये केला जाणारा भेदभाव अधोरेखित केला आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT