Saisha Bhoir left the show Nava Gadi Nava Rajya Aarohi Sambre Replace Her place Marathi child actress  SAKAL
मनोरंजन

Saisha Bhoir News: आई - वडिलांच्या वादाचा लेकीला फटका...साईशाला मालिकेतून काढलं, या बालकलाकाराने घेतली जागा

बालकलाकार साईशा भोईरला नवा गडी नवं राज्य मालिकेतून काढून टाकलंय

Devendra Jadhav

Saisha Bhoir News: गेल्या काही दिवसांपासून बालकलाकार साईशा भोईरच्या कुटुंबात मोठा वाद ओढवला आहे. साईशाची आई पूजा भोईरला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झालीय. साईशाची आई पूजा सध्या तुरूंगाची हवा भोगत आहे.

तर साईशाचे वडील सध्या फरार आहेत. अशातच ज्याची भीती होती अशी गोष्ट घडली आहे. बालकलाकार साईशा भोईरला नवा गडी नवं राज्य मालिकेतून काढून टाकलंय.

(Saisha Bhoir left the show Nava Gadi Nava Rajya Aarohi Sambre Replace Her place Marathi child actress)

साईशाची आई जेलमध्ये आहे. वडील फरार आहेत अशा परिस्थितीत साईशा संबंधी मालिकेच्या निर्मात्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. गेले काही दिवस साईशाबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. साईशा आता मालिकेत दिसणार नाहीये.

साईशा नवा गडी नवा राज्य या मालिकेतून चिंगीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण आता तिच्या जागी आरोही सांबरे ही बालकलाकार मालिकेत झळकणार आहे. आरोहीने इन्स्टाग्राम अकाऊटंवर एक प्रोमो शेअर करत ही अपडेट दिली आहे.

साईशाने याआधी रंग माझा वेगळा मालिकेत अभिनय केलाय. साईशा सध्या नवा गाडी नवं राज्य मालिकेत अभिनय करत होती. साईशाच्या आई - वडिलांच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नव्हतं.

पण आता मात्र या प्रकरणाचा साईशाला त्रास होऊ नये म्हणून मालिकेच्या टीमने हा निर्णय घेतलाय. यापुढे आरोही सांबरे चिंगीची भूमिका साकारणार आहे. एकूणच आई - बाबांच्या कारस्थानांचा परिणाम लहानग्या साईशाला भोगावा लागलाय.

साईशाच्या आई - बाबांचं प्रकरण काय?

साईशाची आई पूजावर काही दिवसांपूर्वी एका जोडप्याला तब्बल १६ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिला अटकही करण्यात आली.

त्यांनतर पंकज जाधव या २५ वर्षीय व्यक्तीने देखील साईशाच्या आईने पैशांसाठी फसवणुक केल्याचा आरोप केला होता. कोठडीत 7 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती.

आता त्यातच या प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारी पोलिस करत असल्याची बातमी समोर येत आहे.

विशांत व पूजा यांनी साईशासोबत काही आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही केल्या आहेत ज्याची पोलीस चौकशी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT