Sajid Khan gets into a fight with shalin bhanot  Google
मनोरंजन

Big Boss16: साजिद खान आणि शालिन भानोतमध्ये जुंपलं भांडण,कारण ऐकाल तर हसू आवरणार नाही

बिग बॉस 16 सुरु होऊन तीन-चार दिवसच झालेयत अन् घरातील सदस्यांमध्ये जोरदार वाद रंगू लागल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Big Boss 16: गेल्या आठवड्याच्या शेवटी बिग बॉस १६ सुरू झाले. हा शो सलमान खान होस्ट करत असल्यानं अर्थातच सोशल मीडियावरील त्याच्या मोठ्या फॅन फॉलोइंगचा शो ला फायदाच होताना दिसून येत आहे. साजिद खान, टीना दत्ता, सुंबुल तौकीर, गौतम विग, यासारख्या अनेक कलांकरामुळे शो लोकप्रिय होत आहे. शो सुरू होताच स्पर्धकांमध्ये भांडणही सुरू झाले. अलीकडील प्रोमोमध्ये, साजिद खान हा शालिन भानोतला स्टँड-अप कॉमेडी मध्ये रोस्ट करताना दिसत आहे.(Sajid Khan gets into a fight with shalin bhanot)

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या बिग बॉस १६ च्या प्रोमोमध्ये, साजिद खान घरात उभारलेल्या स्टेजवर स्टँडअप कॉमेडी करताना दिसत आहे आणि तो त्या स्टँडअप कॉमेडी मध्ये शालिन भानोतला टोमणा मारताना दिसत आहे. साजिद खान बोलला की,''बिग बॉस १६ च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी शालिनने सांगितले होते की तो फराह खानचा दुसरा भाऊ आहे आणि त्या नात्याने शालिन माझा छोटा भाऊ,मग असं असताना शालिनने पहिल्याच दिवशी मला नॉमिनेट का केले? आणि माझ्या या स्टँडअप कॉमेडीला पण त्याने थम्ब्स डाऊन दिला तर हा कसला भाऊ?'' खर तर साजिद आणि शालीनने एकमेकाना नॉमिनेट केले आहे तरी भांडत आहेत आणि बिग बॉस कडे भांडण घेऊन गेलेले दिसतायत.

पण साजिदनं शाब्दिक प्रहार केल्यावर गप्प बसेल तर तो शालीन कसला. त्यानं साजिदला प्रति उत्तर दिले की, जर कोणी माझ्या वाकड्यात गेले तर तो बदला घेईल. म्हणून साजिदनेही तशीच रागात प्रतिक्रिया दिली. साजिदने त्याला घरात खेळू नकोस असे सांगितले, त्यावर शालीनने उत्तर दिले, "तू इथे कोण आहेस असे सांगणारा, नक्की काय पाहिजे तुला? दोघं समोरा समोर येऊन भिडले अन् वादानं टोक गाठलं. पण ज्यावरनं वाद सुरु झाला ते कारण पाहिलं की वाटतं की यांच्यापेक्षा लहान मुलं बरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT