Salaar Box Office Collection Day 2  Esakal
मनोरंजन

Salaar Box Office Collection: फक्त प्रभासचीच हवा! 'सालार' दुसऱ्या दिवशीही चमकला! कमाईचा आकडा शंभरी पार

शनिवारी प्रभास आणि पृथ्वीराजच्या सालार पार्ट-1 सीझफायरने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

Vaishali Patil

Salaar Box Office Collection Day 2: साउथ सुपरस्टार अभिनेता प्रभासचा बहू प्रतिक्षित सिनेमा 'सालार' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सालारची चर्चा होती. आता सालार प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे.

सालारने पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंगसह सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. 'सालार'ने पहिल्याच दिवशी 90.7 कोटीच्या वर कमाई करत रेकॉर्ड केला होता.

दरम्यान, शनिवारी प्रभास आणि पृथ्वीराजच्या सालार पार्ट-1 सीझफायरने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

'सालार'ने अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 90.7 कोटींची ओपनिंग केल्यानंतर प्रभासच्या चित्रपटाने दुस-या दिवशी 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 145.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रभासची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत सालारने शाहरुख खानच्या 'जवान', 'पठाण'ला मागे टाकले होते.

'सालार' चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.

सालारची कथा मैत्रीभोवती फिरते. चित्रपटात प्रभास देवची भूमिका साकारत आहे, पृथ्वीराज सुकुमारन वरदराज मन्नारची भूमिका साकारत आहे, जगपती बाबू राजमन्नारच्या भूमिकेत आहे, तर श्रुती हासन 'सालार'मध्ये आद्याची भूमिका साकारत आहे.

'सलार: पार्ट वन - सीझफायर' तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये रिलीज झाला.

'सलार'च्या एक दिवस आधी शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. 'सालार'ने 'डंकी'चा खेळ बिघडला आणि प्रभासच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.

'डंकी'ने पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींची ओपनिंग दिली, तर 'सालार' रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. तर रिलिजच्या दुसऱ्या दिवशी देखील सालारने चांगली कमाई करत डंकीला मागे टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT