Salaar Box Office Collection Day 4 Esakal
मनोरंजन

Salaar Box Office: ख्रिसमसच्या सुट्टीचा प्रभासच्या 'सालार'ला मजबूत फायदा! जमवला इतक्या कोटींचा गल्ला!

Vaishali Patil

Salaar Box Office Collection Day 4:  यंदा वर्षाच्या अखेर तीन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहे. ज्यात रणबीरचा अॅनिमल, साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खान स्टारर 'डंकी'. मात्र या तिन्ही सिनेमात प्रभासच्या सालारनं सर्वांना मागे टाकले आहे.

सालारला रिलिज होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. त्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. प्रभास स्टारर सालार चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे जाणुन घेऊन या...

सलग फ्लॉप चित्रपटाची रांग लागवणाऱ्या प्रभासच्या करियरला गियर अप करण्याचे काम आता सालारने केलं आहे. आदिपुरुषनंतर प्रभासच्या चित्रपटांकडून प्रेक्षकांना काही खास अपेक्षा नव्हत्या. मात्र दुसरीकडे प्रभासचे चाहते मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता नाताळचा आणि विकेंडचा फायदा देखील सालारच्या कमाईला झाल्याचे दिसत आहे.

'सलार' 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी 90.7 कोटींची ओपनिंग देत सालारनं अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले.

दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी तर तिसऱ्या दिवशी 'सालार'ने 62.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता रिलीजच्या चौथ्या दिवशी सालारने Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 42.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यासह 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर एकूण 251.60 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात सालार'ने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता लवकरच सालार 500 कोटींच्या क्लबमध्ये पोहचणार अशी आशा निर्माते आणि चाहते करत आहेत.

सालार: सीझ फायर- भाग 1 मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भुमिकेत आहे. या सोबतच चित्रपटात श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, सरन शक्ती यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT