Salaar Vs KGF 2 Prabhas movie Teaser viral Rokcy esakal
मनोरंजन

Salaar Vs KGF 2: 'सालार' चे 'केजीएफ 3' सोबत मोठे कनेक्शन, काय आहे खास गोष्ट?

बाहुबली फेम प्रभासचा आदिपुरुषला प्रेक्षकांचा म्हणावा इतका प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यावरुन वादच मोठ्या प्रमाणात समोर आल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Salaar Vs KGF 2 Prabhas movie Teaser viral Rokcy : बाहुबली फेम प्रभासचा आदिपुरुषला प्रेक्षकांचा म्हणावा इतका प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यावरुन वादच मोठ्या प्रमाणात समोर आल्याचे दिसून आले. बिग बजेट चित्रपटांमधून प्रभासनं यापूर्वी प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. मात्र बाहूबली सोडल्यास त्याची कामगिरी काही अंशी नाराजी करणारी ठरली आहे. आदिपुरुषमध्ये प्रभासनं भगवान रामाची भूमिका साकारली होती.

यासगळ्यात प्रभासच्या नव्या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालार मधून प्रभास दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला मिळालेला प्रतिसादही प्रचंड आहे. चाहत्यांनी प्रभासचे आणि दिग्दर्शक नील यांचे कौतूक केले आहे. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांनी केलेल्या कमेंटस चर्चेत आहेत.

सालारचा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट केजीएफ २ चा पुढील भाग म्हटले जात आहे. हा केजीएफचा क्रॉस ओव्हर असे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये, नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. २८ सप्टेंबर रोजी प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानं युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. काही तासांतच त्याला १५ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. प्रशांत नील यांच्या कन्नड भाषेतील केजीएफची निर्मिती केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता.

Salaar Vs KGF 2 Prabhas movie Teaser viral Rokcy fans

केजीएफनं बॉक्स ऑफिसवर केलेली प्रचंड कमाई सगळ्यांनाच माहिती आहे. अशातच या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणून सालारकडे पाहिले जात आहे. त्याचा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हा केजीएफचा ३ भाग असल्याचे वाटत आहे. या चित्रपटामध्ये प्रभास आणि श्रृती हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका चाहत्यानं ट्विटर अकाउंटवरुन केजीएफ आणि सालारचे फोटो शेयर केले आहे. त्यामध्ये केजीएफ २ आणि सालारच्या टीझरमधील फोटो शेयर केले आहेत.

त्या फोटोंमधील लोकेशन हे एकच असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे रॉकीचा केजीएफ आणि प्रभासचा सालार यांच्यात कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. पहिला फोटो केजीएफ २ चा आहे तर दुसरा फोटो सालारच्या टीझर आहे. हा पक्का केजीएफचा क्रॉस ओव्हर आहे असे त्या चाहत्यानं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT