Saleel Kulkarni  
मनोरंजन

'सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह'; सलील कुलकर्णींना कोरोना

स्वाती वेमूल

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. गायक सलील कुलकर्णी यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 'सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली', असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं. सलील सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना या गोष्टीची कल्पना असावी या दृष्टीने ही पोस्ट लिहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात
बॉलिवूड तसेच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार कोरोना बाधित आहेत. आमिर खान, आर. माधवन, रोहित सराफ, विक्रांत मेस्सी, प्रिया बापट, उमेश कामत या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रणबीर कपूर, सतीश कौशिक यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. 

सोमवारी दिवसभरात ३१,६४३ बाधित
राज्यात रविवारी नोंदविण्यात आलेल्या ४० हजार नव्या रुग्णांच्या तुलनेत सोमवारी कमी म्हणजे ३१,६४३ कोरोना बाधितांची नोंद झाली. मात्र, गेल्या सहा दिवसांमध्ये राज्यात दोन लाखांच्या आसपास नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात रविवारी उच्चांकी ४०,४१४ नवे रुग्ण आढळले होते. होळीची सुट्टी तसेच रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्याने सोमवारी रुग्णसंख्या कमी नोंदवली गेली. तर गेल्या २४ तासांत १०८ जणांचा मृत्यू झाला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT