Salman Khan Birthday 
मनोरंजन

Salman Khan Birthday: 55 व्या बर्थडे दिवशी खास संदेश देणाऱ्या सल्लूमियाँविषयीच्या खास गोष्टी

सकाळ ऑनलाईन

Salman Khan Birthday: बॉलीवूडमध्ये 'दबंग' आणि 'टायगर' नावाने लोकप्रिय असलेला सलमान खान 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे तो यंदा दरवर्षीप्रमाणे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नाही. चाहत्यांनीही कोरोनाची नियमावली पाळावी, असा खास संदेश त्यांने रविवारी दिला आहे. 

सलमान खान (HBD Salman Khan) चित्रपटातील आपल्या युनिक डान्स स्टेप, एक्शन आणि ब्लॉक ब्लास्टर चित्रपट देणारा चेहरा आहे. 'दबंग 3' (Dabangg 3) हा त्याचा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तो पुन्हा कधी दिसणार याची त्याच्या चाहत्यावर्गात चांगलीच उत्सुकता आहे. जाणून घेऊयात सलमानविषययीच्या मनोरंजक गोष्टी

- सलमान हा हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक उर्फ सलमा यांचा मुलगा आहे. 

- सलमान खानचे अजोबा  अफगानिस्तानमधून येऊन भारतातील मध्य प्रदेशमध्ये स्थायिक झाले होते. सलमानची आई मराठी हिंदू समजातून येते.

- सलमान खानची सावत्र आई हेलेन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असून काही चित्रपटात हेलन- सलमान एकत्रही दिसले आहेत.  

- सलमान खानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात तो सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.  

सलमान खानवर हक्क गाजवायला 'बिग बॉस'मध्ये येतेय रविना टंडन, सोबतंच रविवार ठरणार खास

- नव्वदीच्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या   'मैंने प्यार किया' या चित्रपटात तो पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारताना दिसले. त्याकाळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटापैकी हा एक चित्रपट आहे.

- सलमान खानला 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जाणारा फिल्मफेअर अवार्डही मिळाला होता.  

 - सलमानने ब्रांद्रास्थित सेंट स्टेनिस्लॉस हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. 

- सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याच्या अनेक चित्रपटांचा समावेश होत असतो.  'वांटेड', 'रेड्डी', 'बॉडीगार्ड', 'टायगर जिंदा है', 'बजरंगी भाईजान' हे सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत येतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT