Salman Khan Latest News
Salman Khan Latest News Salman Khan Latest News
मनोरंजन

Salman Khan : सलमानची ग्लास मिस्ट्री; पार्टीत पॅपराजींना पाहून घाबरला अन्...

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Latest News बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) नुकताच एका पार्टीत गेला. पार्टीत प्रवेश करताना सलमान खानने असे काही केले, जे पाहून चाहते गोंधळले. सलमान खानने हे का केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काय आहे प्रकरण जाणून घेऊ या...

सलमान खान पार्टीत प्रवेश करतानाच्या व्हिडिओमध्ये अर्धा भरलेला ग्लास घेऊन दिसत होता. पॅपराजींना पाहून सलमान खान ग्लास लपवण्याचा प्रयत्न करतो. महत्त्वाचे म्हणजे सलमान खान (Salman Khan) तो ग्लास त्याच्या जीन्सच्या पुढच्या बाजूच्या खिशात ठेवतो. मुराद खेतानीच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान पोहोचला तेव्हा ही घटना घडली.

सलमान खान गाडीतून उतरला. मग त्याने जीन्सच्या खिशात अर्धा भरलेला ग्लास ठेवला. यानंतर त्याने आत प्रवेश केला. पार्टीतून बाहेर पडतानाही सलमान खानने ग्लास धरला होता. यानंतर ते जाऊन कारच्या पुढच्या सीटवर बसतात. सलमान खानच्या या व्हिडिओने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. लोक सलमान खानला विचारतात ग्लासमध्ये काय होते? दुसऱ्याने विचारले, वोडका की गीन टॉनिक?

अनेक युजर्सने ग्लास खिशात टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले. तर सलमान खानच्या चाहत्यांनी ग्लासात पाणी असल्याचे सांगितले. सलमानचे चाहतेही याला भाईजानचे टशन आणि नवा ट्रेंड सांगत आहेत. सलमान खानच्या या ग्लास मिस्ट्रीबद्दल आता तोच चांगला सांगू शकेल. चाहते फक्त अंदाज लावू शकतात.

अभिनेता सलमान खानबद्दल बोलायचे तर तो आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ घेऊन येत आहे. याशिवाय सलमान खानचा टायगर ३ हा चित्रपटही चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांनी सलमानला रुपेरी पडद्यावर पाहिलेले नाही. चाहत्यांना लवकरच ही संधी मिळेल अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT